बारा दिवसात पोलिसांनी जप्त केल्या पाच पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:56 PM2020-03-12T12:56:07+5:302020-03-12T12:57:16+5:30

महानिरीक्षकांची विशेष मोहीम, दारु प्रकरणात १६३ जणांना अटक

Within twelve days, police seized five pistols | बारा दिवसात पोलिसांनी जप्त केल्या पाच पिस्तूल

बारा दिवसात पोलिसांनी जप्त केल्या पाच पिस्तूल

Next

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांच्या आदेशाने २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गुन्हेगारांकडे ५ पिस्तुल, १ जीवंत काडतूस, तलवार इतर २ शस्त्र आढळून आली तर अवैध दारु संदर्भात २२७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली आहे.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी जिल्ह्यात १२ दिवस विशेष मोहीम राबवून आॅपरेशन आॅल आऊट राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जळगाव व चाळीसगाव या दोन्ही परिमंडळात एकाचवेळी मोहीम राबविली. त्यात गुन्हेगारांच्या घराची झडती, फरार आरोपींचा शोध, ज्या गुन्हेगारांवर शस्त्रसंबंधी गुन्हे दाखल आहेत, त्यांची घरझडती, अंमली पदार्थ, पकड वारंट याबाबत धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.
अवैध दारुच्या गुन्ह्यात ९ लाख ३५ हजार तर जुगाराच्या कारवाईत १० लाख ५९ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल व रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
या मोहिमेत जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गुन्हेगाराकडे १ गावठी पिस्तुल तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक पिस्तुल, दोन चॉपर व तलवार आदी जप्त करण्यात आले. याच काळात ३१४ जणांना जामीनपात्र वारंटची तर ५७४ अजामीनपात्र वारंटची बजावणी करण्यात आली. अनैतिक देह व्यापाराचाही पर्दाफाश करण्यात आला. त्यात सहा पीडितांची सुटका करण्यात आली.
महानिरीक्षकांच्या आदेशाने १२ दिवस जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आली. जिल्हास्तरावरही यापूर्वी मोहीम राबविण्यात आली आहे. न्यायालय व पोलीस यंत्रणेचा धाक गुन्हेगारांवर असावा यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवून गुन्हेगारांना अटक केली जाते.भविष्यात हद्दपारीची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Web Title: Within twelve days, police seized five pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव