दोन महिन्यांनी रुग्णसंख्या पाचशेच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:40+5:302021-05-20T04:17:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात एकूण ४९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पाच मार्चनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात एकूण ४९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पाच मार्चनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच एका दिवसात ७७२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता एका दिवसात ४९४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अडीच महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
१५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली असे मानले जाते. १५ रोजी जिल्ह्यात १२४ बाधित आढळून आले होते. मात्र त्यानंतर पुढच्या काही दिवसातच दररोजच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ आढळून आली. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच रुग्णसंख्या पाचशेच्या आत आहे.
बुधवारी साडे सात हजार चाचण्या, पॉझिटिव्हिटी रेट घसरला
बुधवारी दिवसभरात २४८६ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवले आहे. तर ५ हजार ३०८ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यातून फक्त ४९४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अजून ४९२ अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटही घसरला आहे.
१९ वर्षांच्या तरुणासह १२ जणांचा मृत्यू
कोरोनाची दुसरी लाट ही तरुणांसाठी अधिक घातक असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. बुधवारी १९ आणि २५ वर्षांच्या तरुणांसह १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील चार जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील दररोजचे बाधित
२८ फेब्रुवारी ४०८२ मार्च ४९२
५ मार्च ७७२
१९ मे ४९४