वाढदिवस साजरा न करता, चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केले उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 08:37 PM2019-02-01T20:37:45+5:302019-02-01T20:39:01+5:30
शेतकºयांच्या मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदन देवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय समाज सेवा संघ संयोजक तथा निवृत्त जवान ओंकार जाधव यांनी आपला वाढदिवस न साजरा करता, शुक्रवारी एक दिवसीय उपोषण केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : शेतकºयांच्या मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदन देवूनही प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय समाज सेवा संघ संयोजक तथा निवृत्त जवान ओंकार जाधव यांनी आपला वाढदिवस न साजरा करता, शुक्रवारी एक दिवसीय उपोषण केले. या उपोषणाला विविध संस्थेच्या पदाधिकाºयांनी तसेच बोढरे व शिवापूर ग्रामस्थांनी उपोषणास्थळी येवून पाठिंंबा दिला.
ओंकार जाधव यांचा १ रोजी वाढदिवस होता. तो आपला वाढदिवस न साजरा करता तो दिवस त्यांनी शेतकरी हितासाठी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
सायंकाळी तहसीलदार कैलास देवरे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी अॅड. भरत चव्हाण, भास्कर चव्हाण, जितेंद्र पाटील, भीमराव जाधव, नीरज निकम, नीळकंठ साबणे, विश्वजीत नायक, रामदास पवार, चिंतामण चव्हाण, देवेंद्र नायक आदी उपस्थित होते.
त्यांच्या मागण्या अशा- सोलर कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराची सखोल चौकशी होऊन महसूल राज्य मंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत महसूल प्रशासनाने चौकशी अहवाल सादर करावा, सोलर पीडित शेतकºयांना शेत जमिनीचा योग्य तो एकसमान मोबदला देण्यात यावा, शेतकºयांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करुन उभे केलेले टॉवरबाबत गुन्हे दाखल करावे, भूमिहीन शेतकºयांचे शासन नियमानुुसार पुनर्वसन करण्यात यावे, शेतकरी बचाव कृती समिती पदाधिकाºयांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाºयांविरुद्ध कारवाई करावी, मयत अंबिबाई गणेश राठोड या शेतकरी महिलेच्या संशयित मृत्यूची चौकशी करावी आदी मागण्यांचा समावेश होता.