प्रसूत झालेल्या महिलेस ‘सिव्हील’मध्ये मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:47 PM2019-09-06T12:47:38+5:302019-09-06T12:48:04+5:30

जळगाव : प्रसूत झालेल्या महिलेस तिच्या आई वडीलांना सफाई कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सायकांळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय ...

Woman beaten to death in civil | प्रसूत झालेल्या महिलेस ‘सिव्हील’मध्ये मारहाण

प्रसूत झालेल्या महिलेस ‘सिव्हील’मध्ये मारहाण

Next

जळगाव : प्रसूत झालेल्या महिलेस तिच्या आई वडीलांना सफाई कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सायकांळी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसुती कक्षात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
रुपाली काकडे (१९) ही गर्भवती महिला प्रसुतीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल आहे. तिच्या सोबत आई संगीता जाधव, वडील तुकाराम जाधव (रा. तिडका, ता.सोयगाव) हे थांबून आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वच्छतेच्या कारणावरुन संगीता जाधव व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून धक्काबुक्की व मारहाणीचा प्रकार घडला.
दरम्यान, या प्रकाराने भेदरलेले हे कुटुंब रुग्णालयातील पोलीस चौकीत दाखल झाले.यावेळी विवाहिता तसेच तिची आईला अश्रू अनावर झाले होते. सफाई कामगारांचा त्रास आम्ही सहन करत असून आज तर चौघांनी प्रसुत महिलेलाच मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबाकडून सांगितले जात होते. या प्रकरणी संगिता जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून यश जाधव , पवन जाधव, पवनची आई तसेच त्याचा भाऊ यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हयाची नोंद जिल्हापेठ पोलिसात करण्यात आली आहे. येथे रुग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार आहे.

Web Title: Woman beaten to death in civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव