बोदवडमधील महिलेची बाराव्या दिवशी कोरोनाशी झुंज संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:19 IST2020-09-06T16:18:30+5:302020-09-06T16:19:52+5:30
५५ वर्षीय महिलेची बारावी दिवशी ६ रोजी कोरोनाशी मृत्यूची झुंज संपली.

बोदवडमधील महिलेची बाराव्या दिवशी कोरोनाशी झुंज संपली
ठळक मुद्देसुरुवातीला होत होता श्वास घेण्यास त्रासन्यूमोनिया आजारानेही वेढले होते
गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : शहरातील रुपनगर कॉलनीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेची बारावी दिवशी ६ रोजी कोरोनाशी मृत्यूची झुंज संपली.
या महिलेला २५ आॅगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून त्यांना मुक्ताईनगर येथे कोविड सेंटरला उपचारासाठी हलविण्यात आले होते. यात त्यांना निमोनियाही झाला होता, तर गेल्या १२ दिवसांपासून त्या कोरोनाशी झुंज देत होत्या. अखेर ६ रोजी सकाळी त्यांची झुंज अपयशी ठरली असून, यात त्यांचा मृत्यू झाला.
तालुक्यात आजपावेतो कोरोनाने डझनभर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात कोल्हाडी, वरखेड, शेलवड, नाडगाव येथील प्रत्येकी एकेक आणि बोदवड शहरातील सात जणांचा समावेश आहे.