महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 16:56 IST2020-11-08T16:56:12+5:302020-11-08T16:56:48+5:30
बोदवडची घटना, विहिरीत घेतली उडी

महिलेची आत्महत्या
बोदवड : शहरातील जुन्या पोस्ट गल्लीत राहणारी अनिता रमेश पाटील (वय ३८) या महिलेने भुसावळ रस्त्यावरील गट क्रमांक ९१ च्या रस्त्यावरील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या महिलेला एक १८ वर्षीय मुलगा तर एक १६ वर्षीय मुलगी असून गेल्या काही दिवसापासून ती काहीतरी चिंतते होती, अशी चर्चा आजुबाजुचे लोक करत होते. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.