महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:11 PM2020-05-21T22:11:36+5:302020-05-21T22:11:43+5:30

टाकरखेडा येथील घटना

Woman commits suicide by jumping into a well with two children | महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

Next


अमळनेर : आपल्या दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा २१ रोजी सकाळी सहा वाजता गावातील एक तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी शेतात गेला होता नंतर सात वाजेच्या त्याची पत्नी भारती (वय ३२) ही आपले लहान मुले गजानन (वय १२) व स्वामी ( वय ७) या दोन्ही मुलांना घेऊन मदतीसाठी शेतात गेली जाताना तिने जेवणाचा डबा देखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र तो पायी जाईल त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र २०० मीटर अंतरावर गेल्यावर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोघा मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली त्याला वाटले की, पत्नीला देखील घरी यायचे आहे म्हणून तो वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. म्हणून बघायला गेला असता त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला. आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील , पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील लोक घटनास्थळी पोहचले मात्र विहिर ७५ फूट खोल आणि त्यात सुमारे ४० फूट पाणी होते. मातेसह दोघे मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतुन पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. तिघांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सचिन पाटील यांच्याकडे ७ बिघे शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहे. भारतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही

Web Title: Woman commits suicide by jumping into a well with two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.