मोटारसायकल घसरल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:57+5:302021-08-22T04:20:57+5:30
आडगाव तांडा (एरंडोल) येथील ४० वर्षीय महिलेचा मोटारसायकल स्लीप झाल्याने डोक्यास जास्तीचा मार लागल्याने उपचार सुरू असताना मृत्यू ...
आडगाव तांडा (एरंडोल) येथील ४० वर्षीय महिलेचा मोटारसायकल स्लीप झाल्याने डोक्यास जास्तीचा मार लागल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
संगीताबाई साईदास राठोड
(४०, आडगाव तांडा, ता. एरंडोल) या दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आडगाव तांडा येथून नातेवाइकांसोबत मोटारसायकलवर मागे बसून चाळीसगावकडे जात असताना बोळे, ता. पारोळा गावाच्या शाळेजवळ मोटारसायकल स्लिप झाल्याने गाडीमागे बसलेल्या संगीता राठोड यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यांना प्रथम खाजगी व नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दि. १४ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
याबाबत पारोळा पोलिसांत विनोद बद्री चव्हाण (पाटणादेवी) यांच्या खबरीवरून शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जयवंत पाटील करीत आहेत.