यावल येथे महिलेचा सर्पदंशाने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:16 PM2020-11-28T20:16:14+5:302020-11-28T20:16:19+5:30

उपचार न मिळाल्याने गेला बळी

Woman dies of snake bite at Yaval | यावल येथे महिलेचा सर्पदंशाने मृत्यू 

यावल येथे महिलेचा सर्पदंशाने मृत्यू 

Next

यावल :  येथील साने गुरूजी माध्यमिक विद्यालयालया जवळील रहीवासी संध्या अनिल फेगडे (४० ) यांचे सर्पदशाने शनिवारी निधन झाले. स्थानिक पातळीवर आवश्यक सुविधा नसल्याने या महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
 त्या  भालशिाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात काम करीत असतांना त्यांना विषारी सर्पाने चावा घेतला. यानंतर त्यांना लगेच येथील ग्रामीण रुग्नालयात उपचारार्थ आणले असता   पुढील उपचारासाठी जळगाव  येेथे हलवित असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, सासु, दोन मुले असा परीवार आहे.   दरम्यान, स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आवश्यक औषधी नसल्याने सदर महिलेला जळगाव येथे नेण्यास सांगितले. 
मात्र वेळेअभावी तिचा मृत्यू झाला. स्थानिक पातळीवर औषधी उपलब्ध असती तर कदाचित या महिलेचा जीव वाचला असता.

Web Title: Woman dies of snake bite at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.