कोठली येथील महिला मृतावस्थेत विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:08+5:302021-05-30T04:15:08+5:30
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला मृत महिलेचा भाऊ अशोक शामराव पाटील (रा. बोधगाव, ता. जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीहून ...
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला मृत महिलेचा भाऊ अशोक शामराव पाटील (रा. बोधगाव, ता. जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीहून संशयित आरोपी पती बळवंत ऊर्फ बळीराम हिलाल पाटील, मुलगा प्रवीण बळवंत पाटील, जाऊ मनीषा सीताराम पाटील (सर्व रा. कोठली, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, मृत महिला राधाबाई पाटील (३८) हिचा विवाह २०११ साली झाला. यातील आरोपींनी संगनमताने लग्न झाल्यापासून दि. २८ मे २१ पर्यंत वेळोवेळी तू काळी आहेस, असे हिणवून मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला पती, मुलगा, जाऊ या तीन जणांविरुद्ध भादंवि कलम ३०६, ४९८ (अ) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहेत. मृत महिलेचा पती व मुलगा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही मृत महिला हरविल्याची नोंद दि. २८ रोजी भडगाव पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती. आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.