जळगावात धावत्या रेल्वेखाली झोकून देत महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:18 PM2019-04-03T12:18:55+5:302019-04-03T12:23:15+5:30

धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन रेखा किरण राठोड (४८, रा.पतंग गल्ली, जोशी पेठ, जळगाव) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

The woman succumbed to her injuries while running under the running train in Jalgaon | जळगावात धावत्या रेल्वेखाली झोकून देत महिलेची आत्महत्या

जळगावात धावत्या रेल्वेखाली झोकून देत महिलेची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे पहाटे चार वाजताची घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्ट

जळगाव : धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन रेखा किरण राठोड (४८, रा.पतंग गल्ली, जोशी पेठ, जळगाव) या महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा राठोड या बुधवारी पहाटे तीन वाजता घरातून गेल्या. चार वाजता त्यांनी पिंप्राळा रेल्वे गेटजवळ स्वत: ला झोकून आत्महत्या केली. रेल्वे खांब क्र.४१८/२१-२३ दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आला. स्टेशन प्रबंधकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोहमार्गचे उपनिरीक्षक घेटे व सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे हे.कॉ.भरत पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, रेखा यांचे दिर विजय राठोड हे त्यांचा शोध घेत असताना त्यांना पिंप्राळा रेल्वे गेटजवळ महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. तेथे गेल्यावर त्यांनी रेखा यांना ओळखले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
रेखा व पती किरण भगवान राठोड यांचा पतंग बनविण्याचा व बूट, चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पश्चात पती किरण राठोड, मुलगा आकाश, मुलगी हर्षाली व योगिता असा परिवार आहे. हर्षाली विवाहित आहे.
 

Web Title: The woman succumbed to her injuries while running under the running train in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.