महिलेने तरुणीला दुचाकीवर बसवून नेले अन् पुढे थांबलेल्या तरुणाने अश्लील वर्तन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:15 AM2021-03-24T04:15:17+5:302021-03-24T04:15:17+5:30
विनयभंग; दोघांवर गुन्हा जळगाव : ओळखीच्या माध्यमातून महिलेने तरुणीला दुचाकीवर बसवून नेले आणि वाघ नगर येथे सोबत चल ...
विनयभंग; दोघांवर गुन्हा
जळगाव : ओळखीच्या माध्यमातून महिलेने तरुणीला दुचाकीवर बसवून नेले आणि वाघ नगर येथे सोबत चल असे सांगून २० वर्षीय तरुणीचा पुढे थांबलेल्या तरुणाने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी मंगळवारी दोन जणांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, वाघ नगर परिसरात २० वर्षीय तरुणी ही आपल्या आईवडिलांसह राहते. २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ओळखीची वैष्णवी ईश्वर पाठक रा. वाघ नगर हिने तरुणीला वाघ नगरच्या थांब्याजवळ बोलावून घेतले. माझ्यासोबत चल असे सांगून तरूणीला दुचाकीवर बसवून सार्वजनिक ठिकाणी नेले. त्या ठिकाणी तुषार प्रभाकर रोडे (रा. सावखेडा ता. रावेर जि.जळगाव) हा थांबलेला होता. त्यावेळी वैष्णवीने तुषारशी ओळख करून प्रलोभन दाखवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.