जळगाव शहरात घुसून महिलेला मारहाण, टी.व्ही., खुर्च्या फेकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:58 PM2019-10-05T23:58:33+5:302019-10-06T00:00:15+5:30
रामदास कॉलनीतील भाड्याने घेतलेले घर खाली करण्यासाठी मंगला महेश सोनवणे (४०,रा.तानाजी मालुसरे नगर) या महिलेस महिलानीच घरात घुसून मारहाण केली, त्यानंतर घरातील टी.व्ही, खुर्च्या व इतर साहित्य फेकून देत नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तानाजी मालुसरे नगरात घडली. याप्रकरणी सरिता माळी, वंदना पाटील, रेखा पाटील, मनिषा पाटील, शोभा चौधरी व एम.पाटील यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव : रामदास कॉलनीतील भाड्याने घेतलेले घर खाली करण्यासाठी मंगला महेश सोनवणे (४०,रा.तानाजी मालुसरे नगर) या महिलेस महिलानीच ी घरात घुसून मारहाण केली, त्यानंतर घरातील टी.व्ही, खुर्च्या व इतर साहित्य फेकून देत नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तानाजी मालुसरे नगरात घडली. याप्रकरणी सरिता माळी, वंदना पाटील, रेखा पाटील, मनिषा पाटील, शोभा चौधरी व एम.पाटील यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश पाटील, मुलगा प्रतिक, मुलगी लतिका, बहिणाचा मुलगा सागर व त्याची पत्नी भारती असे सर्व जण शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरात टी.व्ही. बघत असताना रात्री साडे नऊ वाजता सरिता माळी या चारचाकीने तर काही महिला दुचाकीने असे १० ते १५ जण घरी आले आणि अचानक शिवीगाळ करायला लागली. तु रामानंद नगरच्या हद्दीतील घर खाली करण्याच्या वादात का पडते आहे असे म्हणत थेट मारहाण करायला सुरुवात केली. माझ्या घरात येवून मलाच दादागिरी करते का? असे म्हटले असता सोबतच्या महिलांनीही मारहाण करुन घरातील टी.व्ही., खुर्च्या व इतर साहित्य फेकून दिले. यापुढे घर खाली करण्याच्या वादात पडली तर तुला पाहून घेईन अशी धमकी दिली. यावेळी शेजारील सरला सोनवणे, आशा सोनवणे व उज्ज्वला कोळी यांनी वाद सोडविला.
नातेवाईकाच्या घरातील ‘सीसीटीव्ही’ची वायर कापली
मंगला सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामदास कॉलनीत गुळवे नामक महिलेच्या घरात दोन वर्षापासून भाड्याने वास्तव्याला आहेत. या घरात सरिता माळी यांना त्यांचे कार्यालय सुरु करावयचे आहे. हे घर खाली करावे म्हणून त्यांनी नातेवाईकांना त्रास देणे सुरु केले आहे. रामानंद नगर पोलिसात खोट्या तक्रारी केल्या आहेत. दोन दिवसापूर्वी नातेवाईक मुलगा जालना येथे असताना त्याची पत्नी एकटीच घरी होती. तेथे सरिता माळी व इतर महिलांनी जावून सीसीटीव्ही कॅमेºयाच्या वायरींग कापून घर खाली करण्याची धमकी दिली.याआधी देखील या घरातील साहित्य फेकून दिले होते. हे घर खाली करण्यासाठी आम्ही सुपारी घेतली आहे, असे धमकावले जात असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.