महिला व बाल रुग्णालयाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:44 AM2019-07-10T11:44:38+5:302019-07-10T11:45:15+5:30

जिल्हा शल्य चिकित्सकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Women and Children's Hospital in District Room | महिला व बाल रुग्णालयाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

महिला व बाल रुग्णालयाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

Next

जळगाव : जिल्हा रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाºया महिला व बाल रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नसल्याचे पत्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांना दिल्याने यामध्ये जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, या विषयीचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयासाठी निधीदेखील मंजूर झालेला आहे. मात्र या वादात तो परत जातो की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार कमी जागेत जास्त निवासस्थाने उभारणे व उर्वरित जागेत महिला व बाल रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागात महिला व बाल रुग्णालय असावे म्हणून तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळून त्यासाठी ३० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
रुग्णालयासाठी प्रशस्त जागा
जिल्हा रुग्णालयाच्या एकूण १२ एकर जागेपैकी ६ एकर जागेत निवासस्थानेच होती. यासाठी जागा जास्त व्यापली गेली होती. ही निवासस्थाने खाली करण्यात आली व ती जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी महिला व बालरुग्णालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होण्यास मदत झाली.
मात्र जिल्हा रुग्णालय सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याने तेथे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे येथे जागा उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांना कळविले. त्यामुळे हे काम रखडले आहे.
या विषयी जिल्हाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत हे रुग्णालय बांधण्याविषयी जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्या होत्या, मात्र त्यात आता अडथळा येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे या विषयी जिल्हाधिकाºयांना पत्र देण्यात आले असून १० जुलै रोजी जिल्हाधिकाºयांना भेटणारदेखील आहेत.

चार एकर जागा वापरू शकतात
जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपलब्ध सहा एकर पैकी २ एकर जागेत महिला व बाल रुग्णालय उभे राहून उर्वरित चार एकर जागा भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरू शकतात. रुग्णालय उभे न राहिल्यास हा निधी परत जाऊ शकतो,असेही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Women and Children's Hospital in District Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव