दारूबंदीसाठी महिलांचा पोलिसांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 01:14 AM2016-01-12T01:14:12+5:302016-01-12T01:14:12+5:30
जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़
जामनेर : गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी मोर्चा काढला़ अधिका:यांना वारंवार याबाबत सूचना आणि तक्रारी केल्या़ मात्र अद्याप दारूबंदी झालीच नाही़ यामागचे काय कारण? दारूबंदी का होत नाही, असा सवाल तालुक्यातील गारखेडा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पोलीस निरीक्षक नजीर शेख यांना करीत महिलांनी घेराव घातला़ आणि गावात दारूबंदी करावी, अशी मागणी केली़ सोमवारी ही घटना घडली़ महिलांच्या या निवेदनाची दखल घेत पोलिसांनी तक्रारही दाखल करून घेतली़ आणि सायंकाळी चक्क अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल़े परिसरातील अवैध दारू विक्रीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आह़े यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात़ त्यासाठी संपूर्ण दारूबंदी करावी, या मागणीसाठी महिलांनी रूद्रावतार धारण केला. पोलीस निरीक्षक नजीर शेख आणि कर्मचा:यांना घेराव घातला़ महिलांची ही तक्रार लक्षात घेत, पोलीस प्रशासनाकडून सायंकाळी अवैध दारूची विक्री करणा:या दोन जणांवर कार्यवाही केली़ पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार, कोमलसिंग पाटील, आनंदसिंग पाटील, हरीश पवार, हंसराज वाघ यांनी ही कारवाई केली़ दारूची विक्री करणारे रमेश फकिरा तडवी आणि बाळू शालिग्राम यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दारूच्या 18 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या़ दोन्ही आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े राजकीय इच्छाशक्तीचा अभाव़़़ तालुक्यात अनेक गावांमध्ये महिलांकडून दारूबंदीची लेखी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून होत आहे. पण दारूबंदीसाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे दारूबंदी झालेली नाही़ (वार्ताहर)