महिला शेतकरी फळबाग अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 08:10 PM2020-09-24T20:10:39+5:302020-09-24T20:10:54+5:30

रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून फळबागेसाठीचे मंजूर अनुदान मिळाले नसल्याची व्यथा तालुक्यातील चिंचखेडसीम येथील महिला शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

Women farmers deprived of orchard subsidy | महिला शेतकरी फळबाग अनुदानापासून वंचित

महिला शेतकरी फळबाग अनुदानापासून वंचित

Next

बोदवड : रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून फळबागेसाठीचे मंजूर अनुदान मिळाले नसल्याची व्यथा तालुक्यातील चिंचखेडसीम येथील महिला शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
चिंचखेडसीम येथील शेतकरी महिला सावित्रीबाई हरी लोहार यांचे गावशिवारातील गट क्र. २८ वर दीड एकर शेत आहे. या शेतात त्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१६/१७ मध्ये ४९ हजार ७६३ रुपये फळबागेसाठी मंजूर झाले होते. त्यात पहिला हप्ता ११ हजार चारशेचा मिळाला. यात त्यांनी लिंबूची फळबाग जगवली व तीन वर्षे या योजनेच्या करारांतर्गत ९० टक्केवर झाडे जगवण्याची तरतूद असताना जगवलीही. परंतु त्यांना तीन वर्षे लोटल्यानंतरही ह्या झाडांचे उर्वरित अनुदान मिळाले नाही.
याबाबत सावित्रीबार्इंनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठत आपल्या पुढील राहिलेल्या अनुदानाची मागणी केली. तेव्हा विभागाकडून अगोदर जागवलेल्या झाडाची पाहणी करू व नंतर पुढील अनुदान देऊ असे सांगितले.
त्यानंतर शेतात कृषी अधिकाऱ्यांनी झाडांची पाहणीही केली. परंतु कृषी साहाय्यक रामकृष्ण झोरे यांनी फक्त ४५ टक्के अहवाल देत सदर शेतकºयांचे अनुदान अडकवले, अशी आईनलाईन तक्रार या महिलेने जिल्हाधिकारी (रोजगार विभाग) कार्यालयात केली. तीही निकाली निघाली. असे असूनही अद्याप अनुदान मिळाले नाही.


नवीनच पदभार घेतला आहे. तसेच या योजनेचा कालावधी संपला आहे. मागील कृषी सहाय्यकाच्या अहवालानुसार त्यांचे अनुदान अडकले आहे.
-डी.एस.वडजे, कृषी सहाय्यक, बोदवड

Web Title: Women farmers deprived of orchard subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.