संपादीत जमिनीचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने महिलेने केले विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:25 PM2018-02-17T13:25:08+5:302018-02-17T14:18:04+5:30
चाळीसगाव तालुक्यातील सौर प्रकल्पस्थळीच घेतले विष
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ - सौर प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नीलाबाई एकनाथ राठोड (५५, रा. बोढरे, ता. चाळीसगाव) या महिलेने सौर प्रकल्पस्थळीच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बोढरे शिवारात घडली.
खान्देशातील विखरण, जि. जळगाव येथील धर्मा पाटील या शेतकºयाने थेट मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न व त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू ही घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील बोढरे (ता. चाळीसगाव) शिवारात अशीच घटना घडली आहे.
नीलाबाई राठोड यांची २१ एकर जमीन सौर प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आली आहे. त्यापोटी त्यांना ४ लाख ८० हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. मात्र वाढीव व उर्वरित मोबदल्यासाठी त्यांच्या चकरा सुरू आहे. तरीही तो मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नीलाबाई यांनी शनिवारी सकाळी प्रकल्प स्थळीच विष प्राशन केले. या मुळे मोठी खळबळ उडाली असून महिलेवर चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.