उपचारासाठी जात असलेली महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 03:43 PM2019-05-16T15:43:33+5:302019-05-16T15:44:41+5:30

एक जखमी : चाळीसगाव जवळ दुचाकी व कारचा अपघात, चारचाकी चोरीची असल्याचा संशय

The women going for the treatment killed | उपचारासाठी जात असलेली महिला ठार

उपचारासाठी जात असलेली महिला ठार

Next

चाळीसगाव : शहरातील खरजई नाक्याजवळ दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना १५ रोजी दुपारी १२ वाजता घडली. अपघातातील चारचाकी चोरीची असल्याचा संशय आहे. वाहनात चोरून आणलेल्या आठ शेळ्या आढळल्या.
याबाबत माहिती अशी की, अंजनाबाई उर्फ बेबाबाई पंढरीनाथ चौधरी (६५ रा.टाकळी प्र.चा.) या काका सुनील चौधरी यांच्या दुचाकी (क्र. एम. एच.१९ ए.जी.६५२९) वरुन दवाखान्यात जात असतांना तुषार हॉटेल समोरुन रोडने चारचाकी (क्र.एम.एच.१५ ए.जे.०६८९) ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी रस्त्यावर फेकली गेली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ देवरे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अंजनाबाई चौधरी यांना तपासले असता त्यांनी त्यांना मयत घोषीत केले. काका सुनील चौधरी यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. अपघातातील चारचाकी चालकाचे नाव सलीम करीमखान पठाण (वय २६ रा. मखमलाबाद, पंचवटी नाशिक) असे आहे. त्याच्या सोबत इतर दोन इसम होते. चारचाकीत ८ शेळ्या होत्या. त्याही संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले. चाळीसगाव शहर पोलिसात मुकेश मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चारचाकी कारचालकास ताब्यात घेतले. अंजनाबाई चौधरी यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चालक सापडल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अंजनाबाई चौधरी मृत्यू प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बनावट नंबर प्लेट आणि शेळ्याही निघाल्या
अपघातात पोलिसांना सापडलेली चारचाकी ही बनावट नंबरची असण्याची दाट शक्यता आहे. तिच्यात विविध नंबरच्या सहा ते सात नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. याच वाहनात चोरून नेल्या जात असलेल्या ८ शेळ्या आढळून आल्या आहेत.

Web Title: The women going for the treatment killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात