रोजंदारीत वाढीसाठी महिला धडकल्या ग्रामपंचायतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:53+5:302021-06-09T04:20:53+5:30

मनवेल, ता. यावल : रोजंदारीत वाढ करावी, या मागणीसाठी शेतमजूर महिला सोमवारी मनवेल ग्रामपंचायतीवर धडकल्या. याआधी गावातून मोर्चा ...

Women hit Gram Panchayat for increase in wages | रोजंदारीत वाढीसाठी महिला धडकल्या ग्रामपंचायतीवर

रोजंदारीत वाढीसाठी महिला धडकल्या ग्रामपंचायतीवर

Next

मनवेल, ता. यावल : रोजंदारीत वाढ करावी, या मागणीसाठी शेतमजूर महिला सोमवारी मनवेल ग्रामपंचायतीवर धडकल्या. याआधी गावातून मोर्चा काढत ग्रामपंचायतीत मागण्यांचे निवेदन दिले.

शेतमजूर महिलांना शेतात दिवसभर काम करून १०० रुपये रोज मिळतो. वाढत्या महागाईमुळे १०० रुपये रोज परवडत नाही. रोजंदारीत वाढ करण्यासाठी दगडी व मनवेल येथील महिलांनी दोन दिवसांपासून कामावर बहिष्कार टाकला आहे. कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे संतप्त महिला सोमवारी ग्रामपंचायतीत धडकल्या. सरपंच जयसिंग सोनवणे यांना निवेदन देऊन रोजंदारीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली.

मनवेल ग्रामपंचायतीची आज मासिक सभा सुरू होती. सभा संपल्यावर शेतमजूर महिला व मुकादम यांनी रोजंदारीत वाढ करण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावात दवंडी देण्यात येईल, व गावातील शेतकऱ्यांशी रोजंदारीत वाढ करण्याबाबत ८ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

रोजंदारीत वाढ करण्यासाठी शंभरावर दगडी व मनवेल येथील लह्याबाई भिल, कल्पना कोळी, कमलबाई कोळी, वत्सलाबाई कोळी, वत्सलाबाई भालेराव, सुनीता भालेराव आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women hit Gram Panchayat for increase in wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.