महिलांनी केली पोलिसाची धुलाई

By admin | Published: March 10, 2017 12:18 AM2017-03-10T00:18:29+5:302017-03-10T00:18:29+5:30

पारोळा : वाहनचालकाला मारहाण करणे पडले महाग

Women Kelly Pollution Washing | महिलांनी केली पोलिसाची धुलाई

महिलांनी केली पोलिसाची धुलाई

Next

पारोळा : चार चाकीला  धक्का लागल्याच्या कारणावरून एका तीन चाकी वाहनधारकाला बेदम मारहाण करणा:या पोलिसाची महिलांनी यथेच्छ धुलाई केली. हा प्रकार  अमळनेर-पारोळा रस्त्यावरील भिलाटी दरवाजाजवळ गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकाराची शहरात दिवसभर खमंग चर्चा सुरू होती.
द्राक्षे घेऊन येणारी तीनचाकी गाडी अमळनेर रस्त्याकडून भोई गल्लीकडे येत होती. त्याचवेळी पोलिसाची चारचाकी गाडी भोई गल्लीतून अमळनेर रस्त्याकडे येत होती. पोलिसाच्या गाडीला द्राक्षाच्या गाडीचा धक्का लागला. गाडीला खरचटले गेल्याने पोलिसाचा पारा चढला. त्याने गाडीतून खाली उतरत तीनचाकी वाहनचालकाकडे पाच हजार रूपयांची भरपाई मागितली. त्या गाडीवाल्याने नकार देताच पोलिसाने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. तो विनवणी करीत असतानाही पोलिसाचा संताप कमी होत नव्हता. त्या परिसरातील महिला, युवकांनी पोलिसाची समजूत काढण्याचा प्रय} केला. मात्र पोलीस ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे महिलांचाही संयम सुटला. अखेर महिलांनी  तीन चाकी वाहनधारकाला मारणा:या पोलिसाची यथेच्छ धुलाई केली.
दरम्यान, मार खाणारा पोलीस हा पारोळा तालुक्यातील रहिवाशी असून, सध्या तो जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. यापूर्वीही त्याने अशीच दादागिरी केल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)

Web Title: Women Kelly Pollution Washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.