जळगावनजीक महामार्गावर कंटेनरच्या धक्क्याने खर्ची येथील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:46 PM2018-03-21T12:46:44+5:302018-03-21T12:46:44+5:30

बिबानगरनजीक अपघात

The women killed in the cost of container on the Jalgaon highway | जळगावनजीक महामार्गावर कंटेनरच्या धक्क्याने खर्ची येथील महिला ठार

जळगावनजीक महामार्गावर कंटेनरच्या धक्क्याने खर्ची येथील महिला ठार

Next
ठळक मुद्देदोन जण जखमीकंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ - दुचाकीला ओव्हरटेक करण्याऱ्या कंटेनरचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या भारती संतोष पाटील (४०, रा. खर्ची, ता. एरंडोल) ही महिला ठार झाली तर दुचाकी चालक दिनकर बाबुराव पाटील (५७, रा. वाघुळखेडा, ता. पाचोरा) हे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी महामार्गावर बिबानगर येथे झाला. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले आहे.
भारती संतोष पाटील (४०) या शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या नातेवाईकाची प्रकृती पाहण्यासाठी ननंद अरुणाबाई दिनकर पाटील (३८) आणि ननंदेचा पती दिनकर बाबुराव पाटील (५१, दोन्ही रा. वाघुळखेडा ता. पाचोरा) यांच्यासोबत जळगावला आल्या होत्या. तेथून दुचाकीवर खर्ची गावाकडे जात असताना बिबानगर जवळ मागून येणाºया कंटेनरने (क्र. एचआर ५५ डब्ल्यू ८३१२) दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला व समोरुन अचानक येणारे वाहन पाहून कंटेनर चालक कौशलेंद्र प्रतापसिंग राजपूत (४०, रा. उत्तर प्रदेश) याने कंटेनर डाव्या बाजूला घेतले व त्या वेळी दुचाकीला धक्का लागला. त्यात अरुणाबाई दिनकर पाटील आणि दिनकर बाबुराव पाटील हे बाडूला फेकले गेले. मात्र मागे बसलेल्या भारती पाटील कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्या जागीच ठार झाल्या.
अपघातानंतर जखमी व मृतांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोहेकॉ संजय चौधरी, पो.कॉ. समाधान टहाळके, पो.ना. उमेश भांडारकर यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले.
पती माजी उपसरपंच तर जाऊ सरपंच
मयत भारती संतोष पाटील यांचे पती संतोष पाटील हे खर्चीचे माजी उपसरपंच आहेत तर त्यांच्या जाऊ विद्यमान सरपंच असल्याचे जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी सांगितले. मोठा मुलगा दिल्ली खासगी कंपनीत नोकरीला असून मुलगी जळगाव येथील महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षाला आहे तर लहान मुलगा एरंडोल येथे बारावीला आहे.

Web Title: The women killed in the cost of container on the Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.