जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडी येथील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:11 PM2018-02-04T22:11:18+5:302018-02-04T22:12:38+5:30

अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.

Women killed in Mohd, a truck in Jalgaon highway |  जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडी येथील महिला ठार

 जळगावात महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडी येथील महिला ठार

googlenewsNext
ठळक मुद्देबांभोरीजवळील घटना नातेवाईकांकडे जात असताना झाला अपघात पती जखमी


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,४ : अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाईकांकडे दुचाकीने जात असलेल्या वसंत पंडीत खैरनार (वय ६०) व त्यांच्या पत्नी मिराबाई खैरनार (वय ५२) रा.मोहाडी, ता.जळगाव या दाम्पत्याला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकच्या टायरखाली येऊन मिराबाई खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडे सात वाजता महामार्गावर बांभोरी येथील जैन इरिगेशन या कंपनीच्या समोर झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसंत खैरनार व त्यांच्या पत्नी मीराबाई भरवस येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच.१९ ए.जे.४४१७) सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. बांभोरीजवळ जैन इरिगेशन  कंपनीजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्र.डब्यु.बी.२३ ई ९४१५) जोरदार धडक दिली. त्यात वसंत खैरनार हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर त्यांच्या पत्नी रस्त्यावर पडल्याने या ट्रकचे टायर त्यांच्या अंगावरुन गेले. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या.

पत्नीचा मृतदेह पाहून पती बेशुद्ध
अंगावरुन ट्रक गेल्याने मिराबाई यांच्या शरीरातील मांस बाहेर आले. ते रस्त्यावर पसरले होते. या अपघातात जखमी झालेल्या वसंत खैरनार  हा प्रकार पाहिल्यावर जागेवरच बेशुध्द पडले. दरम्यान, जैन इरिगेशन कंपनीच्या सहकाºयांनी तत्काळ पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळवून घटनास्थळ गाठले. सहायक फौजदार रमेश पाटील, किरण धमके व सुमित पाटील यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तर अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली. दरम्यान, घटना घडल्यानंतर चालक ट्रक सोडून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Women killed in Mohd, a truck in Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.