टारगट मुलांच्या विरोधात महिला पोलीस ठाण्यात
By admin | Published: July 13, 2017 05:51 PM2017-07-13T17:51:06+5:302017-07-13T17:51:06+5:30
भुसावळात गोविंद कॉलनी, सोमेश्वर कॉलनीत प्रचंड उपद्रव, घबराटीचे वातावरण
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.13- भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये विशेषत: शाळा-कॉलेज परीसरात टारगट मुलांच्या त्रासामुळे महिला व शाळकरी मुलींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. टारगट तरूणांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महिला आणि पुरुषांनी शहर पोलीस ठाणे गाठत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत दिलासा दिला.
लागलीच कारवाई
महिला व पुरुषांनी व्यथा मांडताच साहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तत्काळ पोलिसांना पाठवून काही टारगट आणि रोडरोमीयोंना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली.
दारू पिवून धिंगाणा
गोविंद कॉलनी व सोमेश्वर कॉलनीतील रेल्वे ड्रेनेज परीसरात टवाळखोर मुल सकाळी 6 ते रात्री 10 वाजे र्पयत सिगारेट, दारु पिवून गोंधळ घालतात. मुलींना आणून गैरकृत्य करतात. या प्रकाराला विरोध केल्यास शिवीगाळ करतात. यातील अनेक मूल राजकीय पक्षांशी संबंधित आहेत.ते नगरसेवकांचे नाव सांगून त्रास देतात,अशा तक्रारी या भागातील संतप्त महिला व पुरुषांनी केल्या आहेत.
पोलिसांची कारवाई सुरूच
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने शहरातील श्रीमती प.क.कोटेचा विद्यालय, श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय आणि सेंट अॅलॉयसेस हायस्कूल, नारखेडे विद्यालय या भागात या आधीच रोडरोमीयोंवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सातत्य आहे. तरीदेखील सोमेश्वर नगर व गोविंद कॉलनी जवळील मोकळ्या जागेवर टारगटांचा उपद्रव वाढला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
निलोत्पल यांना दिले सह्यांचे निवेदन..!
यशवंत वाघोदे, अशोक वाणी, रमेश पाटील, दत्तात्रय महाजन, गणेश महाजन, पवन टाक, के.के.नेहेते, एस.आर.भोळे, महेश पाटील, अशोक पाटील, विश्वनाथ वारके, मनीराम बोरकर, नवाज शेख, शशिकांत रायमळे यांच्यासह शेकडो महिलांच्या सह्या असलेले निवेदन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.