दारूबंदीसाठी महिलांची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 08:53 PM2020-02-02T20:53:11+5:302020-02-02T20:53:17+5:30

पाचोरा येथील उपनिरीक्षकांना घेराव : अनेक गावांतील महिलांनी दिले निवेदन

Women run to police station for drunkenness | दारूबंदीसाठी महिलांची पोलीस ठाण्यात धाव

दारूबंदीसाठी महिलांची पोलीस ठाण्यात धाव

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : अवैध दारूने सर्वत्र थैमान घातले असून संबंधित यंत्रणा दारू विक्रेत्यांवर ती कारवाई करताना दिसत नसल्याने गावोगावी महिला पुढाकार घेऊन दारूबंदीसाठी पुढे येत आहेत. अशाच प्रकारे शनिवारी गाळण खुर्द व बुद्रूक, हनुमानवाडी, विष्णुनगर येथील तांड्यावरील महिलांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठले व पोलीस उपनिरीक्षकांना गराडा घालत गावातील दारू तातडीने बंद करावी, अशी मागणी करीत निवेदने दिली.
अनेक गावांतील महिला पोलीस ठाण्यात येऊन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना घेराव घालीत गावातील दारूबंदी त्वरित करावी व दारुड्यांवर वचक बसवावा, अशी मागणी करीत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली.
दारूच्या व्यसनामुळे कर्ते पुरुष, मुले वेगवेगळ्या आजारांनी ग्रासल्याने प्रशासनाने यावर तातडीने बंदी आणावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
हारपणी ब्रिगेडच्या अध्यक्षा जिजा राठोड, रेखा राठोड, लता राठोड, कमल राठोड, सुमन राठोड, सगुणा राठोड, बेबा राठोड, कविता राठोड, सुरेखा वर्जन राठोड, डाळी राठोड, सगुणा राठोड, सुनीता किशोर राठोड, सागर राठोड, कविता राठोड, निकी राठोड आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातही निवेदन सादर केले.

Web Title: Women run to police station for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.