महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 09:04 PM2019-02-14T21:04:21+5:302019-02-14T21:06:19+5:30

महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.

Women should be respected in society | महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

googlenewsNext
ठळक मुद्देचाळीसगाव येथे राष्ट्रीय परिषदेत देवयानी ठाकरे यांचे प्रतिपादन‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

चाळीसगाव, जि.जळगाव : महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.
बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या सहयोगाने १४ रोजी ‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल होते.
व्यासपीठावर जि.प.शिक्षण समिती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मिता बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शुभदा ठाकरे, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, विनोद कोतकर, स्मिता बच्छाव, संपदा पाटील, बुदेलखंडी प्रदीप अहिरराव, क.मा.राजपूत इत्यादी उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख डॉ.डी.एस.निकुंब यांनी केले.
यावेळी न्यायाधीश अनिता गिरडकर आपल्या बीज भाषणात म्हणाल्या की, महिलांसोबत पुरुषामध्येसुद्धा जागृती होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच पुरुष वाईट नाही, पण विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण कायद्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. जेव्हा २२-२३ वर्षाचे मुलं-मुली घटस्फोटासाठी येतात, तेव्हा खूप वाईट वाटते की, कुठे भरटकतो आहे, समाज आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. तसेच त्यांनी महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती सांगीतली.
सूत्रसंचालन डॉ.गंगापूरकर व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले तर आभार अजय काटे यांनी मानले.

Web Title: Women should be respected in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.