न्यूनगंड बाजूला ठेवून महिलांनी प्रशासनात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:57 AM2019-03-08T11:57:14+5:302019-03-08T11:59:27+5:30
-निता कायटे
महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अन्यायग्रस्त व पीडित महिला निकोचपणे म्हणणे मांडतात..त्यामुळे त्यांच्या मनाची अवस्था व बेतलेल्या प्रसंगाची जाणीव होते आणि त्यातूनच अशा महिलांना न्याय देता येते...महिला अधिकारी म्हणून यापेक्षा कोणता मोठा आनंद असू शकत नाही..असे स्पष्ट मत सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले.
निता कायटे या मुळच्या सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत. औरंगाबाद विद्यापीठातून त्यांनी एम.एससी आॅरगेनिक केमिस्ट्रीची पदवी घेतली. त्यानंतर महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. २०१० मध्ये उपनिरीक्षक म्हणून त्यांची पोलीस दलात निवड झाली. जळगाव व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला काम केल्यानंतर पदोन्नतीने त्यांची जळगावला बदली झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर आता सध्या स्थानिक गुन्हे शाखेत सहायक निरीक्षक व महिला सहाय्य कक्षाच्या प्रमुख म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत. सिल्लोड येथे घरी असताना शेजारीच प्रांताधिकारी वर्षा ठाकूर या वास्तव्याला होत्या. त्यांना दररोज घरी घ्यायला व सोडायला लाल दिव्याचे सरकारी वाहन येत होते. एक महिला असूनही त्यांचा रुबाब किती होता..हे मी पाहिल..त्यामुळे आपणही मेहनत घेतली तर असे लाल दिव्याचे वाहन मिळू शकते असा निश्चिय केला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. लाल दिव्याचे वाहन मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र ते वाहन घरी घेऊन जाता येते. मुळ रहिवाशी असलेल्या गावी नियुक्ती मिळत नाही.
सण,उत्सव नशिबात नाही
पोलीस खात्यात असल्याने सण, उत्सव हे कधीच कुटुंबासोबत साजरा करता आले नाहीत. दोन दिवसापूर्वी पतीचा वाढदिवस होता. रात्री साजरा करण्याचे नियोजन केले.मात्र अचानक आॅपरेशन आॅल आऊटचा वायरलेस संदेश आला आणि सर्व कामे सोडून ड्युटीवर जावे लागले..महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ किंवा सहकारी यांच्याकडून कधीही त्रास झाला नाही..उलट मदतच मिळाली. आपण महिला असल्याने तक्रारदार महिला आवर्जून जवळ येवून त्यांच्या व्यथा मनमोकळ्यापणाने मांडतात..त्या पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ मांडता येत नाही. त्यामुळे भावी पीढीतील तरुणींनी पोलीस दलात निंकोचपणे यावे...कोणताही न्यूनगंड ठेवू नये..पोलीस म्हणून आपण एखाद्याला कायद्याची जाणीव करुन देतो..तेव्हा लोक विश्वास ठेवतात..महिलांना न्याय देण्याची व त्यांचे मनोबल उंचावण्याची एक ताकद निर्माण होते.
-निता कायटे,
सहा. पोलीस निरीक्षक