नांद्रा येथे दारुबंदीसाठी महिलांनी केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:34 PM2017-07-22T12:34:28+5:302017-07-22T12:34:28+5:30
शुल्क विभागाचे अधीक्षक एस़एल़आढाव यांच्याकडे ठराव सुपूर्द करण्यात आला आह़े
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 22 - अनेक दिवसापासून तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील ग्रामस्थांसह महिलांचा दारुबंदीसाठी पाठपुरावा सुरु होता़ अखेर यासाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानाच्या प्रक्रियेत गावातील 70 टक्के महिलांनी भरपावसात मतदान करुन दारुबंदीचा ठराव केला़ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस़एल़आढाव यांच्याकडे ठराव सुपूर्द करण्यात आला आह़ेनांद्रा बुद्रूक गावात 15 ते 20 वर्षापासून देशीदारु विक्रीचे सरकारमान्य दुकान आह़े हे दुकान बंद करण्यात यावे, यासाठी गावातील रहिवासी अॅड़ दीाक वाघ, हिरामण वाघ, विलास चौधरी, डी़एऩपाटील,नरेंद्र पाटील यांच्यासह महिलांचा पाठपुरावा सुरु होता़ दहा ते 15 दिवसांपूर्वी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेवून अधीक्षकांना निवेदन दिले होत़े त्यानुसार अधीक्षक एस़एल़आढाव यांनी शुक्रवारी दारुबंदीसाठी गावातील मतदानाची प्रक्रिया पार पडली़ यावेळी सरपंच विकासराव सोनवणे, ग्रा़प़ंसदस्य चुडामण वाघ, सदस्य शरद सोनवणे उपस्थित होत़े