महिलांच्या मतदानाने ऐनपुरात ‘बाटली आडवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:13 AM2017-08-19T00:13:12+5:302017-08-19T00:15:32+5:30

जिल्हाधिका:यांचे आदेश : मद्य विक्री दुकाने कायमस्वरुपी बंद

Women voted 'bottle horizontally' at Ainpur | महिलांच्या मतदानाने ऐनपुरात ‘बाटली आडवी’

महिलांच्या मतदानाने ऐनपुरात ‘बाटली आडवी’

googlenewsNext
ठळक मुद्दे दारुबंदीसाठी निवेदन दिले होते1555  महिला मतदारांनी मद्य विक्री बंद करण्यासाठी मतदान केलेपरवाना धारकांना ते जिल्ह्यात इतरत्र स्थालांतरीत करण्याची मुभा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील मद्य विक्री दुकाने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले. 
ऐनपूर येथे दारुबंदी करण्यासंदर्भात मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संस्था, ऐनपूर आणि महिलांनी 29 एप्रिल रोजी ऐनपूर येथील दारुबंदीसाठी निवेदन दिले होते. याबाबत भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क  निरीक्षकांनी सह्याची पडताळणी करून याबाबतचा अहवाल रावेर तहसीलदार यांना सादर केला होता. 
त्यानंतर रावेर येथील तहसीलदारांनी   दारुबंदी संदर्भात मतदान प्रक्रिया राबवून एकूण 2615  महिला मतदारांपैकी 1555  महिला मतदारांनी मद्य विक्री बंद करण्यासाठी मतदान केले होते. एकूण 59 टक्के महिला मतदारांनी दारुबंदीच्या बाजूने मतदान केले होते. हे मतदान 50 टक्के पेक्षा जास्त असल्याने गृहविभागाच्या दारुबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या परवाना धारकांना ते जिल्ह्यात इतरत्र स्थालांतरीत करण्याची मुभा राहील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Women voted 'bottle horizontally' at Ainpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.