वहिनी जरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले : आदेश बांदेकरांना दारात पाहून महिला थक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:22 PM2018-07-27T13:22:19+5:302018-07-27T13:36:12+5:30
छबी टिपण्यासाठी प्रचंड गर्दी
जळगाव : वहिनी जरा घरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले आहेत...असे म्हणत अभिनेता तथा शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी महिलांना हाक दिली. चक्क दारावर भावजींना पाहून महिला थक्क झाल्या. त्यांची छबी टिपल्यासाठी महिलावतरुणींनीप्रचंड गर्दी केली होती.
शिवसेनेच्या प्रचारासाठी गुरुवारी ‘होम मिनीस्टर’ फेम आदेश बांदेकर म्हणजेच महिलांचे लाडके भावजी यांनी शहरात अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली घेतली. ज्या-ज्या ठिकाणी आदेश बांदेकरांची रॅली निघाली त्या-त्या भागात वाहतूककोंडी झाली होती. बांदेकर यांनी शहरातील विविध सहा प्रभागांमध्ये रॅली घेतली. सकाळी ९ वाजेपासून प्रचाराला सुरुवात केली. प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील सेना उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार केला. यावेळी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर संघटक दिनेश जगताप आदी उपस्थित होते. महाबळ कॉलनी, मायादेवी नगर, शारदा कॉलनी परिसरात त्यांनी नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्यानंतर प्रभाग १४ मधील आदर्श नगर, गणपती नगर, गायत्री नगर या भागात प्रचार रॅली केली.
भावजींनी केले महिलांना आपलेसे
आदर्श नगर भागात प्रचार रॅली दरम्यान आदेश बांदेकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रभागातील समस्यांसोबत इतर गोष्टी जाणून घेतल्या. प्रचार रॅली दरम्यान, काही घरे बंद असल्याचे दिसून आल्यावर आदेश बांदेकरांनी घराबाहेरून वहिनी, जरा घरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले... असे म्हणत आदेश बांदेकरांनी सर्वांनाच आपलेसे केले. गणेश कॉलनी, शिव कॉलनी या भागात देखील बांदेकरांनी प्रचार रॅली घेतली.
पांडे चौकात तुफान गर्दीमुळे वाहतुक कोंडी
दुपारी २ वाजता आदेश बांदेकर यांनी प्रभाग ६ मधील उमेदवारांसाठी प्रचार रॅली घेतली. यावेळी विराज कावडीया यांच्या घरी आदेश बांदेकरांचे आगमन झाले. त्यांची छबीटिपण्यासाठी परिसरातील महिलांनी तुफान गर्दी केली होती. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी देखील आपली वाहने रस्त्यावरच थांबवल्यामुळे या भागात प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. बांदेकरांसोबत सेल्फी काढण्यासाठी युवतींनी बांदेकरांभोवती गर्दी केली.
आमदारांनी केली वाहतूक सुरळीत
पांडे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे पाचोºयाचेआमदार किशोर पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी काही पदाधिकाºयांशी त्यांचे चांगलेच खटके उडाले. अनेक वाहनांना त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. बांदेकर यांनी तुकारामवाडी,गणेशवाडी,साई परिसर या भागात प्रचार केला.