जिजामाता विद्यालयात महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:34+5:302021-03-09T04:18:34+5:30
निर्भया पथकातील महिलांचा सत्कार (फोटो) प्रगती विद्यालयात निर्भया पथकातील महिलांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थापक प्रेमचंद ओसवाल होते ...
निर्भया पथकातील महिलांचा सत्कार (फोटो)
प्रगती विद्यालयात निर्भया पथकातील महिलांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थापक प्रेमचंद ओसवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुनाखे होत्या. यावेळी निर्भया पथकप्रमुख मंजुळा तिवारी, कविता राजपूत, वर्षा डोंगरदिवे, राजश्री मौर्य आणि अशोक वाघ यांनी शाळेला भेट दिली. कार्यक्रमास मनीषा पाटील, शोभा फेगडे, ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
गौरवगाथांचे कथन (फोटो)
गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय येथे विद्यार्थिनींनी ऑनलाईन पद्धतीने सावित्रीबाई फुले, किरण बेदी, मदर तेरेसा, सायना नेहवाल, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, पी़ टी़ उषा अशा कर्तृत्ववान महिलांची भूमिका सादर करून महिलांच्या गौरवगाथा कथन केल्या. शाळेतील सर्व उपशिक्षिका तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांचा शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
फॅमिली ट्री उपक्रम (फोटो)
सरस्वती विद्यामंदिरात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली देवरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी महिला स्वसंरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. सुवर्णलता अडकमोल यांनी व्हाट्सॲप ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॅमिली ट्री उपक्रम घेतले़ उपक्रमात साक्षी बारी, रोशनी बारी, वैष्णवी बारी, भाविका सोंगडा, ऐश्वर्या बारी, मुकेश पाटील, खुशी जगताप, चिराग महाले, सोनाक्षी अहिरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
महिलांचे आरोग्य व स्वच्छतेवर मार्गदर्शन
केसीईच्या पी. जी. महाविद्यालयात महिलांचे आरोग्य व स्वछता या विषयावर संबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एस . झोपे, निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. सोनल महाजन व सूक्ष्मजीव विभागप्रमुख प्रा. संदीप पाटील यांची उपस्थिती होती़ डॉ. सोनल महाजन यांनी महिलांच्या समस्या व आजार या विषयांवर मागर्दर्शन केले. प्रा. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचन, आरोग्याचे व संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये जागर नारी शक्तीचा (फोटो)
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागर नारीशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा चौधरी आणि आकाशवाणीच्या ज्येष्ठ उद्घोषका डॉ. उषा शर्मा यांची मुलाखत घेण्यात आली़ यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयिका रत्नमाला पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजनीदिपश्री कोळी, दीपाली बडगुजर यांनी केले. तसेच स्पर्धेमध्ये संध्या बुंदे, रूपाली कुलकर्णी, भाग्यश्री भावसार, ऐश्वर्या जोशी, शीतल कांकरिया यांनी बाजी मारली.