अमळनेर येथे बाललैगिंक अत्याचार घटनांच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:46 PM2018-02-26T15:46:18+5:302018-02-26T15:46:18+5:30

तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रातांधिका-यांना दिले निवेदन

Women's Front in protest against Child-Based Atrocities in Amalner | अमळनेर येथे बाललैगिंक अत्याचार घटनांच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा

अमळनेर येथे बाललैगिंक अत्याचार घटनांच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देअमळनेर महिला मंचतर्फे काढण्यात आला मुकमोर्चामुली आणि महिलांच्या छेड काढणा-यांवर केली कठोर कारवाईची मागणीप्रातांधिका-यांना निवेदन देत केली कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.२६ : तालुक्यातील कळमसरे आणि दोंडाईचा येथील घटनेच्या निषेधार्थ अमळनेर महिला मंचतर्फे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास विश्राम गृह ते तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन संबंधित आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थीनींसोबत अश्लिल चाळे करणारा शिक्षक व दोंडाईचा येथील नुतन हायस्कूलातील पाच वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अमळनेर महिला मंचतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
तहसील कार्यालयासमोर येथील कन्या शाळेतील विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करत मुली आणि महिलांच्या छेड काढणा-यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली.
मुकमोर्चात डॉ.अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, जयश्री दाभाडे, योजना पाटील, प्रा.शिला पाटील, सुलोचना वाघ, माधुरी पाटील, रंजना देशमुख, अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, विजया जैन, नयना कुलकर्णी, भारती गाला, वसुंधरा लांडगे, सरोज भांडारकर, उज्वला शिरोडे, पुष्पाबाई भामरे, पुष्पाबाई राजपूत, सुरेखा पवार, राजश्री पाटील, प्रियंका पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women's Front in protest against Child-Based Atrocities in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.