रोटरी सेंट्रलतर्फे महिला आरोग्यविषयक जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:47+5:302021-04-06T04:14:47+5:30

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे एम.आय.डी.सी.तील श्रद्धा पॉलिमॅटस येथे १९ ते ५० वर्षे वयोगटातील ४० ...

Women's health awareness by Rotary Central | रोटरी सेंट्रलतर्फे महिला आरोग्यविषयक जागृती

रोटरी सेंट्रलतर्फे महिला आरोग्यविषयक जागृती

Next

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे एम.आय.डी.सी.तील श्रद्धा पॉलिमॅटस येथे १९ ते ५० वर्षे वयोगटातील ४० महिला कामगारांसाठी मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य या विषयावर संवाद साधण्यात आला. महिलांच्या शंकांचे, समस्यांचे निरसन करण्यात आले. तसेच सॅनिटरी पॅडसचे वितरण करण्यात आले.

यावेळी रोटरी सेंट्रलच्या सदस्या डॉ. विद्या चौधरी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजी नायर यांनी केले. यावेळी अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासार, डॉ. प्रीती पाटील, ज्योत्स्ना महेंद्र रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

==============

३० मुलांना पोषक आहार वितरण

जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्त ३० मुलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ जयंत जहागीरदार, डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, दिलीप जैन, स्वाती ढाके, मनीषा बागुल उपस्थित होते.

Web Title: Women's health awareness by Rotary Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.