पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:16 PM2019-03-08T12:16:16+5:302019-03-08T12:16:23+5:30

-शिल्पा गाडगीळ

Women's major contribution to the environment | पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

googlenewsNext


प्राचीन ग्रंथ आणि भारतीय संविधान यांचा पर्यावरण संरक्षण दृष्टीकोन विसरून आपण स्वाथार्साठी निसर्ग ओरबाडत आहोत. संपूर्ण विश्वात जीवसृष्टी असणारा एकुलता एक ग्रह म्हणजे पृथ्वी हा होय. या पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.यांत अभिमानाची गोष्ट म्हणजे पर्यावरण रक्षण व संवर्धनात भारतीय महिला अग्रेसर आहेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे सन १७३० चे चिपको आंदोलन होय. जोधपुरच्या महाराजांचा महाल बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्यास आलेल्या सैन्यास खिजडी गावातील अमृतादेवी या महिलेने कडाडून विरोध करतांना तिला व सोबतच्या ६३ लोकांना जीव गमवावा लागला.यातूनच चिपको आंदोलनाची मुहूर्त मेढ रचली गेली.
१९७४ मध्ये शासनाने चामोली जिल्ह्यात जंगलतोडीला सुरवात केली होती तेंव्हा तेथील रैणी गावातील गौरादेवी या महिलेनी ‘जंगल म्हणजे आमचे माहेर, ते तोडू देणार नाही’ असे ठणकावून सांगत अन्य महिलांना सोबत घेऊन चिपको आंदोलन केले आणि वृक्षतोड थांबवली. १९७७ मध्ये अडवाणी गावातील बचनीदेवी या महिलेने याच आंदोलनाचा पवित्रा घेत वृक्षतोड थांबवली. चिपको आंदोलनाचे हे लोण सर्व भारतभर पसरले. दक्षिण भारतातही जंगलतोडीस विरोध करण्यासाठी १९८३ मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड भागात असेच ‘अप्पिको आंदोलन’ करण्यात आले. अशा कितीतरी महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत जसे उदयपुर जवळील रेताड प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी झटणारी ‘सेवामंडल’ ही महिलांची संस्था, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनातील महिला, सरदार धरण विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर,चीनमधील मेई नेग, केनियातील वानगेरी मथाई, रशियाची मारिया शाराकोवा, अमेरिकेची रचेल कार्झान यांचे काम मोठे आहे
-शिल्पा गाडगीळ, पक्षिमित्र , जळगाव

Web Title: Women's major contribution to the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.