महिला बचत गटांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:51+5:302021-07-29T04:17:51+5:30
पथराड, ता. धरणगाव : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पथराड येथे महिला बचत गटांची कार्यशाळा घेण्यात ...
पथराड, ता. धरणगाव : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पथराड येथे महिला बचत गटांची कार्यशाळा घेण्यात आली. यात महिलांच्या २९ बचत गटांना जवळपास २५ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले.
अभियानातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रभागस्तरीय गंगा मॉडेल परसबागेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केले. आभार तालुका व्यवस्थापक पंकज पाटील यांनी मानले. अध्यक्षस्थानी सरपंच सचिन पवार होते. ग्रामसेवक श्याम सुंदर पाटील, सरपंच सुनीता निकम, उपसरपंच मीराबाई पाटील, डॉ. रवींद्र साळुंखे, मुख्याध्यापक जे. के. पाटील, अंगणवाडी सेविका ललिता जाधव, मुख्याध्यापक यशवंत बेलदार, गोकुळ भिकन लंके, वीरेंद्र निकम, महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापक रोशन कुमार, एचडीएफसी बँक व्यवस्थापक महेंद्र कुलकर्णी, तालुका व्यवस्थापक चंद्रकांत सोनवणे, प्रभाग समन्वयक प्रमोद बोडके उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया आवटे, प्रतिभा मराठे, पुष्पा मुलमुले, आदींनी परिश्रम घेतले.