शब्दांचं हळदी कुंकू

By Admin | Published: May 3, 2017 05:39 PM2017-05-03T17:39:24+5:302017-05-03T17:39:24+5:30

वीकेण्ड या सदरात नीता केसकर यांनी भाषा या विषयावर केलेले लिखाण.

The word kundu | शब्दांचं हळदी कुंकू

शब्दांचं हळदी कुंकू

googlenewsNext

 पहाट, झाली की शेजारील मंदिरातून ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ हे भक्तिगीत ऐकू येतं. आणि बघता बघता सारं गावं जागं होतं. घरातली ‘स्त्री’ घर अंगण साफ करते. आणि दारात सडा टाकते आणि त्यावर सुंदरशी रांगोळी काढते. घराघरात धुपारती सुरू होते आणि बघता-बघता सकाळ सा:यांनाच प्रसन्न करते. ही आमची मराठी संस्कृती, मराठी भाषा, त्यातील शब्द म्हणजे शब्दांचं हळदी कुंकू असतं.

मराठी, आम्हाला लिहायला, वाचायला शिकवते. मुलं जेव्हा प्रथम शाळेत जातं तेव्हा ‘अ’ आईचा शिकवला जातो. आणि, मग काना, मात्रा, वेलांटी. पण मात्र मराठी कोलांटय़ा, उडय़ा कधीच घेत नाही.
दोन, व्यक्ती एकत्र भेटल्या, की, नमस्कार ! कसे आहात हे बोललं जात. याचाच, अर्थ आमची ‘मराठी भाषा’ माणसं जोडते. सगळय़ांना एकत्र आणते. नव्हे, आम्हाला नम्रता शिकवते. आमच्या ‘मराठीला’ शिस्त आहे. ती ‘úकार’ स्वरुप आहे. योगासनाच्या वेळेत जेव्हा ‘úकार’ शिकवला जातो, त्या वेळेस आपल्या सगळय़ांना, वेगळीच अनुभूती येते, या शब्दाची.
आमची मराठी भाषा भारुड म्हणते. पोवाडा गाते, आणि लावणीसुद्धा. मराठी सोज्वळ, सात्विक आणि शांत आहे. पण, जर कां तिच्या वाटेस कोणी  जाण्याचा प्रयत्न केला तर खबरदार जर टाच मारून, जाल पुढे कोणी’ ही सूचना देऊन जाते.
कवी ‘जगदीश खेबुडकरांनी ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटासाठी गीतं लिहिलीत. त्यातील अनेक गीतांपैकी एक ‘पापण्यांची तोरणं बांधून डोळय़ावरती’ असे शब्द सहज लिहून जातात. पापण्यांना ‘तोरणांची’ उपमा कवी, देतात. कधी आडवा शब्द येतो, तर उभा शब्द येत नाही. त्याला कारण, आमचा मराठी भाषेचा शब्दकोष हा विश्वकोष आहे. मराठी खुप श्रीमंत आहे, वैभव संपन्न आहे. 
 संत मुक्ताबाई ज्ञानोबांना म्हणतात ‘ताटी उघडा- ज्ञानेश्वरा!’ म्हणजे शब्द एक अर्थ अनेक. ताटी म्हणजे दरवाजा आणि कावड म्हणजेसुद्धा दरवाजा. आता, तुम्ही मराठी शब्दांची ज्योत तेजाळतांना दिसेल. जिला, कधी काजळी धरत नाही.
‘अळी मिळी गुप चिळी’ प्लीज ट्रान्सलेट धीस लाईन इन इंग्लिश’!
मराठी भाषेत किती तरी म्हणी आहेत- आणि, ह्या म्हणी म्हणजे मराठी शब्दांचा सुरेख भरजरी पदरच असतो. जेवढा विणाल तेवढा शब्दाचा शेला’ अधिक रेशमी होतो, मुलायम होतो. किती लिहावं, तिच्याबद्दल.
जरतारी पदरावरती मोर नाचतो, आई मला नेसव शालू नवा’- हे शब्द जेव्हा आपण ऐकतो, त्या वेळी आपल्या डोळय़ासमोर अक्षरश: नाचणारा मोर दिसतो आणि तो भरजरी पदरसुद्धा. अशी ही मराठी भाषा. शब्दांचे चिमटे ती घेत असते.
‘नटसम्राट’ हे नाटक लिहिणारे लेखक तथा कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर म्हणजे मराठी शब्दांचा खजिना आपल्याला देतात. अरे, मला घर देतां कां कोणी घर किंवा, माझं एक कोकरू होतं.. ‘कोकरू’ म्हणजे लहान  बाळ. या ठिकाणी आमची मराठी भाषा आम्हाला जिव्हाळा देते. शब्दाचं नातं काय आहे, हे सांगून जाते.
मराठी शब्द ‘नटसम्राट’ नाटकाला- एका वेगळय़ाच उंचीवर घेऊन जातात. आणि ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानं सन्मानित होतात. आणि, कवी-लेखक कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर तुमचे आमचे केव्हा होऊन जातात, कळतच नाही. नाकावर हळद, कपाळावर कुंकू, माझी मराठी भाषा कुठं मी ठेवू!
- नीता केसकर

Web Title: The word kundu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.