शब्दवेडी दिशा

By admin | Published: May 16, 2017 01:07 PM2017-05-16T13:07:52+5:302017-05-16T13:07:52+5:30

तिचं उघड उघड झापणं, मध्येच विचित्र तळमळ - तग तग जाणवणं. तिचं जगणं आणि जगण्यातला संघर्ष दाखवतं तिचं हे सर्व व्यक्त होणं माझंच असं वाटावं.

Word of mouth | शब्दवेडी दिशा

शब्दवेडी दिशा

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 16 - शब्दवेडी दिशाची फेसबुकवर पोस्ट पाहिली की उत्सुकतेनं वाचावं. अंतमरुख करणा:या तिच्या कविता, तिचं व्यक्त होणं,  समाजाप्रती तिचा तिरस्कार, पुरुष विकृत मानसिकतेनं तिला इनबॉक्समध्ये छळणं, तिचं उघड उघड झापणं, मध्येच विचित्र तळमळ - तग तग जाणवणं. तिचं जगणं आणि जगण्यातला संघर्ष दाखवतं तिचं हे सर्व व्यक्त होणं माझंच असं वाटावं. व्हॉट्सअॅप रोमिओंचा दिशाला का त्रास व्हावा? तिचे भडक रंगवलेले ओठांचे फोटो, डोळ्यांचे फोटो, वेगवेगळ्या अदा प्रोफाईलवर पाहून तिचे अंतरीचे व्यक्त होणे तिची काव्य प्रतिभा, स्वानुभूती यांचा ताळमेळ लागेना? असणं, नसणं आणि शब्दातून व्यक्त होणं, यातली तफावत दिसत होती. मनाचा गोंधळ कमी झाला, तो एका पोस्टने की ‘‘कुठल्या एका कॉलेजला दिशाला आमंत्रित केले गेले आणि तृतीयपंथीचे जगणे व व्यथा यावर भाष्य केले. तेव्हा कुठंतरी अंदाज आला. दिशाच्या प्रोफाईल फोटोचा पण तिचे शब्दातून व्यक्त होणे काळीज चिरत होते. तिचे विखारी वास्तव दाखवणारे शब्द तिच्यासह मनात आदराचे घर करत होते. एके दिवशी फेसबुकवर तिच्या प्रवासासंबंधी पोस्ट वाचली अन् संवाद करावासा वाटला. फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर कधी कधी बोलत राहिलो. बोलणारा तिची उत्तरे संक्षिप्त पण छान-बोचक समर्पक असतात. त्यावरून तिच्या चातुर्याचाही हेवा वाटतो.
उदा. मी : दिशा शिक्षण काय ग?
दिशा : प्रामाणिकपणे 7 वी पास.
मी : अगं एक कर ना, 17 नंबरचा फॉर्म भरून 10 वी करून घे.
दिशा : (हसून) कॉपी करून 10 वीही पास.
मग मुक्त विद्यापीठ वगैरे वगैरे सल्ले देत राहिली व तिही मोठय़ा मनाने फुकट सल्ल्याला होत हो करत राहिली. कारण तिच्या मुलाखतीत तिचे बोलणे, समाजाचा अभ्यास, उत्तर देण्याची शैली पाहत राहिली.
नेमके तिचे बाहेर कार्यक्रम होते, तिला येता आले नाही. ती येणार आहे यासाठी मुलाजवळ सतत तिचा, तिच्या कवितांचा, स्वभावाचा विषय मुलाजवळ घेत राहिली. ती आलीच तर त्याला वेगळे वाटू नये, ह्यासाठी मानसिक तयारी करत राहिली.
एके दिवशी सहज त्याचा कल घेण्यासाठी विचारले, ‘आपल्याकडे दिशा आली तर.? ‘पटकन म्हटला’ मम्मी घर आपले आहे.. आपली मर्जी आपण कोणाला बोलवायचे. लोकांचा काय धाक? आणि माङया मताचा त्याच्यावर होणारा सकारात्मक परिणाम बघून आनंद झाला. म्हणजे मी दिशाचे स्वागत करायला मोकळी झाले, पण अजून तो योग आला नाही.
योग आला तो तिच्या भेटीचा. 18 मार्च 2017 रोजी महाराष्ट्र साहित्य परिसर पटवर्धन सभागृहात पत्रकार शर्मिष्ठा भोसले दिशाची मुलाखत घेणार व तिचे काव्यवाचनही होणार, असे दिशाकडूनच कळलं. 19 रोजी  एल्गार सामाजिक साहित्य संघटनेकडून मला ‘स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ पुण्यात दिला जाणार होता.
जायचे आहे तर एक दिवस आधी जावे व दिशाचा कार्यक्रम अटेंड करायचाच ठरवले. पुण्यासारख्या शहरात एकटीने जाणे, मला तरी अवघड. पण विचारत विचारत माणूस दिल्लीला पोहोचतो, ह्यातला अर्थ सार्थ झाला. चेह:यावर धाडसाचा मुखवटा घेऊन प्रवास करीत, पटवर्धन सभागृहात पोहोचल्यावर हातापायाची थरथर, छातीची धडधड बंद झाली. मोठ्ठा श्वास घेतला, दिशा स्टेजवर दिसली न् तो देह तिथर्पयत नेणा:या मन, हृदय, मेंदू, विचार, भीती, गोंधळ, धडधडला विराम मिळाला. हायसे वाटले.
सभागृहात खूप गर्दी होती. ती मला दिसत होती, पण मी तिला दिसावी म्हणून माझी धडपड चालू होती. मिळाल्या जागी कशीबशी उभी राहून तिचा शब्द न् शब्द कानाची ओंजळ करून मनात साठवत होती. तिच्या वक्तव्यावर पडणा:या टाळ्या, पुढे काय बोलेल ह्याची उत्सुकता वाढवत होत्या. तिची बोलण्याची लकब, उत्तर देण्याची भाषाशैली लाजवाब होत्या. समाजातील पुरुषी विकृतीची उदाहरणे, त्याबाबत चिड, तिरस्कार मग ऐकून ‘स्त्री’ जातीला होणारा त्रास ध्यानी येतो. पण तृतीयपंथीलाही विकृतीने छळावे? ह्याचे आश्चर्य, घृणा निर्माण होत होती.
 तिची काळीज कापणारी, मनाचा ठाव घेणारी, हिन प्रवृत्तीला प्रबोधन करणारी, परखडपणे झापणारी, फटके देणारी मुलाखत ऐकून ‘तो’ ‘ती’ पेक्षा वेगळे जग, अनुभवविश्व बघायला मिळाले. दुर्लक्षित घटकाला सिद्ध करण्याची तिची त:हा समाजमनाचं वेगळं रूप समोर ठेवत होती. तिच्या बोलण्यातील काही मुद्दे ‘तो’ अन् ‘ती’ सोडून बाकी सर्व तृतीयपंथी ठरविणा:या बुद्धीची मला कीव येते. त्याच्या आतल्या माणसाचा विचारच केला जात नाही.
 बहुलिंगी, समलैंगिकतेचे पदर समजून न घेता सरळ तृतीयपंथी म्हणून ओळखणे हा अन्याय आहे किंवा त्यांचे अज्ञान आहे आणि हेटाळणी, तिरस्कार, तुच्छतेचे जगणे आमच्या माथी मारले जाते. आमच्या भावना दुखावल्या जातील हा विचारही त्यांच्या डोळ्यात येत नाही. उलट विनोदीकरण, विद्रूपीकरण करण्यावर भर असतो... दिशा सांगत होती..
 - लतिका चौधरी  

Web Title: Word of mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.