अजिंठा चौफुली ते कुसुंबा रस्त्याच्या कामाला महिनाभरात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:50+5:302021-02-10T04:16:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या दरम्यानच्या कामाला महिनाभरात सुरुवात करण्यात येणार आहे. या ...

Work on Ajanta Chaufuli to Kusumba road started within a month | अजिंठा चौफुली ते कुसुंबा रस्त्याच्या कामाला महिनाभरात सुरुवात

अजिंठा चौफुली ते कुसुंबा रस्त्याच्या कामाला महिनाभरात सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या दरम्यानच्या कामाला महिनाभरात सुरुवात करण्यात येणार आहे. या चार किमीच्या रस्त्यासाठी तब्बल ४० कोटींचा खर्च येणार आहे. त्यात विजेचे खांब हलविण्यापासून सर्व कामांना केली जाणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जळगाव आणि जालना या दोन विभागांच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यात विविध रस्त्यांची कामे केली जात आहेत, तर जळगाव ते चाळीसगाव हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे विभागाकडे आहे. त्यामुळे हा चार किमीचा रस्ता धुळे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरातच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कुसुंबा ते अजिंठा हा रस्ता जालना विभाग, कुसुंबा ते अजिंठा चौफुली हा रस्ता धुळे, शहरातून जाणारा महामार्ग आणि बाहेरून होत असलेला नवा चौपदरी बायपास हा जळगाव विभागाच्या अंतर्गत येतो.

Web Title: Work on Ajanta Chaufuli to Kusumba road started within a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.