बोरी नदीवरील भिलाली बंधाऱ्याचे काम पडले बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:39 PM2018-05-18T17:39:13+5:302018-05-18T17:39:13+5:30
तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार शासनाने सदर प्रकल्पास मान्यता दिली परंतु विलंब झाल्याने पाटील यांनी उपोषण व पाठपुरावा केल्याने दोन वर्षांनी बंधाºयाच्या सव्वा तीन कोटीच्या खर्चास जलसंधारण मंडळाने २१ मार्च २०१३ मध्ये मान्यता दिली. या बंधाºयाचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तथापि सुधारीत खर्चास मान्यता न मिळाल्याने गेल्या महिन्यापासून काम बंद पडले आहे.
लोकमत आॅनलाईन
अमळनेर ,दि.१८ : बोरी नदीवरील कोल्हापूर टाइप भिलाली बंधाºयाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रलंबित असल्याने गेल्या महिन्यापासून काम बंद पडले असून २१ मे पासून ग्रामस्थांनी नदी पात्रात उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. प्रशासकीय विलंबामुळे यंदा पाणी साठण्याची आशा धूसर झाली आहे.
पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील भिलाली बंधाºयाच्या १.१६ दश लक्ष घनमीटर पाणी वापरास २०११ मध्ये तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार मान्यता दिली परंतु विलंब झाल्याने पाटील यांनी उपोषण व पाठपुरावा केल्याने दोन वर्षांनी बंधाºयाच्या सव्वा तीन कोटीच्या खर्चास जलसंधारण मंडळाने २१ मार्च २०१३ मध्ये मान्यता दिली. मात्र जलसंपदा विभागाच्या २०११- १२ च्या दरसूचिनुसार ती मान्यता दिली होती. जुलै १४ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती. या योजनेस जलविज्ञान प्रकल्प यांनी १.१६ दश लक्ष घन मीटर पाणी वापरास मान्यता दिली होती. गेल्या जानेवारी महिन्याअखेर बंधाºयाचे ८५ टक्के काम झाले आहे.
मात्र कामाचे उशिरा आदेश तसेच किमतीतील वाढ , दरसुचितील वाढ , नवीन तरतुदी, वहन अंतरातील बदल, अनुषंगिक वस्तू व सेवा कर आदी बाबींमुळे बंधाºयाची किंमत साडे सात कोटींनी वाढून ती सुमारे ११ कोटी पर्यंत झाली आहे.
हा प्रकल्प सतत अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने भिलाली व परिसरातील गावांसाठी बोरी नदीत पाणीसाठा निर्माण करणे गरजेचे आहे. आणि वाढीव खर्चास प्रशासकीय मान्यता देखील गरजेची आहे.
मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण विभाग ) पुणे व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद यांनी १०१ ते २०५ हेक्टर सिंचन क्षमतेच्या कोल्हापूर बंधाºयास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. आधीच तीन वषार्पासून दुष्काळ व यंदाची तीव्र टंचाई त्यामुळे गतीने कार्यवाही होणे गरजेचे होते. वेळीच वाढीव खर्चास सुधारित मान्यता मिळाली असती तर जूनपूर्वी बंधाºयाचे काम पूर्ण झाले असते व यंदाच्या पावसाळ्यात बोरी नदीत पाणी साठा निर्माण होऊन अमळनेर व पारोळा तालुक्यातील बोरी नदी काठ परिसरातील गावांची पाणी टंचाईवर मात करता आली असती. मात्र यंदा ही शक्यता मावळली आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे हे काम त्वरित व्हावे म्हणून भिलाली सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व शेतकºयांनी २१ मे रोजी नदी पात्रात उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या सुधारीत खर्चास त्वरित मान्यता देऊन शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करावे अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.