तापी नदीवरील भोकर पुलाचे काम तीन महिन्यात होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:18+5:302021-05-11T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव, चोपडा आणि धरणगाव या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या भोकर ते खेडी भोकरी दरम्यानच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव, चोपडा आणि धरणगाव या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या भोकर ते खेडी भोकरी दरम्यानच्या तापी नदीवरील अतिशय महत्वाकांक्षी अशा १५२ कोटी रूपये खर्चाच्या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३ महिन्यात या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव तालुक्यातील पूल व रस्ते कामांचे भूमिपूजन सोमवारी पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कामांना झाली सुरुवात
किनोद ते फुफनी या रस्त्याच्या कामाचे नूतनीकरण, घार्डी ते नांद्रा दरम्यान पुलाचे काम आणि जामोद ते भोकरच्या दरम्यान लहान पूल या कामांना सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सुरुवात झाली. मतदारसंघातील शेत रस्ते आणि शिवरस्त्यांना दर्जोन्नत करून त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासह त्यांचे डांबरीकरण करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता (श्रेणी-१ ) सुभाष राऊत यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जनाअप्पा पाटील- कोळी, रामचंद्र पाटील, बाला लाठी, प्रमोद सोनवणे, समाधान पाटील, पंकज पाटील, मुरलीधर पाटील, सरपंच हरीश पवार, अनिल भोळे, शिवाजी सोनवणे, बाळू अहिरे, शाखा अभियंता महाजन, बेडिस्कर , मच्छींद्र पाटील, ठेकेदार सुधाकर कोळी, शेखर तायडे, मनोहर पाटील दिलीप जगताप, यांच्यासह सरपंच ग्रा.पं. सदस्य, प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.