बडवाणी येथे झोपडीतूनच चालते ज्ञानदानाचे कार्य

By admin | Published: April 19, 2017 11:56 AM2017-04-19T11:56:32+5:302017-04-19T13:43:17+5:30

जागा नसल्याचे कारण सांगून गेल्या आठ वर्षापासून येथे शाळेची इमारतच बांधली गेली नाही. परिणामी विद्याथ्र्याना कुडाच्या खोलीत बसूनच ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे.

The work of Gnan is carried out from the hut in Badwani | बडवाणी येथे झोपडीतूनच चालते ज्ञानदानाचे कार्य

बडवाणी येथे झोपडीतूनच चालते ज्ञानदानाचे कार्य

Next
ऑनलाईन लोकमत विशेष /रावसाहेब पाटील  
बिडगाव, दि.19 - ग्रामीण भागातही खाजगी शाळांच्या टोलेजंग इमारती उभ्या राहत असतांना, अधिका:यांच्या अनास्थेमुळे दुर्गम भागातील जि.प. शाळांची स्थिती काय आहे, हे बडवाणी (ता.चोपडा) येथील शाळेवरून लक्षात येते. जागा नसल्याचे कारण सांगून गेल्या आठ वर्षापासून येथे शाळेची इमारतच बांधली गेली नाही. परिणामी विद्याथ्र्याना कुडाच्या खोलीत बसूनच ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे.
सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेले बडवाणी (ता.चोपडा) हे संपूर्ण आदिवासींची वस्ती असलेले गाव. येथे पूर्वी वस्ती शाळा होती. मात्र शासनाच्या नियमानुसार या शाळेचे जि.प.शाळेत रुपांतर झाले. येथे पहिली ते चौथीर्पयत वर्ग असून, 42 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
 परिसरातील अनेक वस्ती शाळांचे जि.प.शाळामध्ये  रुपांतर झाले. त्या शाळांसाठी इमारती बांधण्यात आली. मात्र येथे शाळा खोल्या बांधण्यात न आल्याने, पहिली ते चौथीर्पयतचे सर्व विद्यार्थी एका झोपडीत बसूनच विद्यार्जनाचे काम करीत असतात.
 बडवाणी गाव सातपुडय़ाच्या पायथ्याशीच आहे. तेथे  गावठाणची जागाच नाही गावापासूनच वनविभागाची हद्द येथे सुरु होते. त्यांच्या हद्दीत जागा मिळावी म्हणून ग्रामस्थ मुख्याध्यापक यांनीही प्रयत्न केले. मात्र कधी शिक्षण खात्याचे अधिकारी पाठपुरावा करीत नाहीत तर कधी वनखात्याचे अधिकारी तांत्रिक अडचणी दाखवत प्रस्ताव फेटाळतात, हे चक्र आठ- नऊ वर्षापासून सुरू असल्याने त्याचा फटका विद्याथ्र्याना बसत आहेत. पावसाळ्यात तर गळत्या झोपडीत विद्याथ्र्याना बसावे लागते. या ठिकाणी नियुक्त शिक्षकांनाही मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. शाळा खोल्याबांधण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून सात लाखांचा निधी मिळालेला आहे. मात्र शाळा बांधकामाचे काम लालफितीतच अडकले आहे.
एकीकडे शासन जि.प.शाळा डिजीटल करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. मात्र अधिका:यांच्या टोलवाटोलवीमुळे शाळेसाठी जागा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
वनविभाग तांत्रिक अडचणी काढतात- पवार
 बडवाणी शाळेच्या इमारतीच्या जागेसाठी गावठाण जागा नसल्याने वनविभागाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठवले. मात्र किरकोळ तांत्रिक अडचणी दाखवत ते जागा देण्यात अडथळा आणतात, असे गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार यांनी सांगितले.
 
वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला-काझी 
शिक्षण विभागाकडून आम्हाला प्रस्ताव मिळाला आहे. आम्ही तो वरिष्ठ अधिका:यांकडे पाठवला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बडवाणी शाळेसाठी जागा देवू असे देवङिारी क्षेत्राचे वनक्षेत्रपाल काझी यांनी सांगितले.
 
आमदारांच्या प्रयत्नांनी 
जागा मिळवू-मुख्याध्यापक
वनविभागाकडून इमारतीच्या बांधकामासाठी जागेबाबत प्रस्ताव पाठवले आहेत. आमदारांनीही यात लक्ष घातले असून त्यांच्या प्रयत्नांनी जागा मिळवून देवू असे मुख्याध्यापक चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितले.

 

Web Title: The work of Gnan is carried out from the hut in Badwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.