शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:49+5:302021-04-17T04:15:49+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी जळगाव प्राथमिक शिक्षण विभागाने पत्र ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी जळगाव प्राथमिक शिक्षण विभागाने पत्र जारी केले आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत आहे. त्यामुळे शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक सेना, शिक्षक भारतीसह इतर शिक्षक संघटनांनी केली होती. अखेर गुरूवारी शिक्षण उपसंचालक यांनी कोविड अंतर्गत आपत्कालिन सेवेसाठी घेण्यात आलेले शिक्षक वगळून अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारच्या शालेय कामकाजासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, न. पा., मनपा, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत शाळेतील उपस्थितीबाबत सवलत देण्यात आली आहे. या शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे.