जळगाव ते कुसुंबा मार्गाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:06+5:302021-05-01T04:15:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या रस्त्यावरील तीन किमीचे काम करण्यास सुरुवात झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या रस्त्यावरील तीन किमीचे काम करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद मार्गाचे काम सुरू होते. मात्र, त्यातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या तीन किमीच्या टप्प्याला सुरुवात झालेली नव्हती. औद्योगिक वसाहतीतून आता हा तीन किमीचा रस्ता जाणार आहे. त्याचा फायदा विमानतळाकडे जाणारे प्रवासी आणि औद्योगिक वसाहतीला होणार आहे.
सध्या अजिंठा चौफुली ते कुसुंबा हा फक्त दोन लेनचा लहान रस्ता आहे. हा रस्ता ३ किमीचा असून त्याच्या कामाची किंमत सुमारे ८ कोटी रुपये आहे. आता हा रस्ता चौपदरी होणार असून त्याचे काम धुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. या रस्त्यामुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच याच रस्त्यावर विमानतळदेखील असल्याने विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.
कोट - विमानतळ आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. हा रस्ता लवकरच पूर्णत्वास येणार असून सध्या त्याचे काम प्रगतिपथावर आहे.
- उन्मेश पाटील, खासदार