शिरसोली येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:27+5:302021-04-30T04:20:27+5:30

शिरसोली प्र.बो. व प्र.न. या दोन्ही गावांची पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपासून सामूहिक असून, या पाणीपुरवठा योजनेमध्ये दापोरा येथील ...

Work on new water supply scheme started at Shirsoli | शिरसोली येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

शिरसोली येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

Next

शिरसोली प्र.बो. व प्र.न. या दोन्ही गावांची पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपासून सामूहिक असून, या पाणीपुरवठा योजनेमध्ये दापोरा येथील गिरणा नदीच्या काठावरील विहिरीवरून होत होता, परंतु जस जसे गावाची लोकसंख्या वाढत गेली, तसतसा गावाला होणारा पाणीपुरवठा हा दोन दिवसांवरून दहा दिवसांवर गेला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय पेयजल योजना २०१९ अंतर्गत शिरसोली प्र.बो. गावासाठी स्वतंत्र एक कोटी ६२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, या योजनेच्या कामाला जानेवारी, २०२१ मध्ये सुरुवात झाली. यात विहिरीचे तसेच पाइप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर चार लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. सात ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील यांनी सांगितले.

नव्याने होणारी पाणीपुरवठा योजना गावापासून पाच ते सहा कि. मी. अंतरावर असून, या विहिरीसाठी धानोरा ग्रामपंचायतने गिरणा काठी गावठाणची जागा दिली आहे. या ठिकाणी २५ फूट व्यास व पन्नास फूट खोल असे विहिरीचे कामपूर्ण झाले आहे.

Web Title: Work on new water supply scheme started at Shirsoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.