सायगाव परिसरात दुष्काळीस्थितीत हाताला नाही काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:42 PM2018-12-14T16:42:34+5:302018-12-14T16:44:50+5:30
कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.
सायगाव, ता.चाळीसगाव : कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही.
गिरणा मन्याड परिसरांत संकटमय प्रवास
गिरणा मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने शेतकºयांचे आर्थिक चित्र पूर्णपणे कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर शेतकºयांसारखे हतबल होण्याची वेळ आलेली आहे.
नविन वर्षात पाण्याचे संकट
यावर्षी परतीच्या पावसानेदेखील हुलकावणी दिल्याने शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. त्यामुळे सन २०१८ हे वर्ष अतिशय निराशाजनक ठरत आहे. सन २०१९ या वर्षाला सुरुवात होत असताना जानेवारी ते जुलै दरम्यान जलसंकट भीषण राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण होणार आहे.
दुष्काळ जाहीर पण हातात काय?
यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शासनाने तालुका दुष्काळी घोषित केला. यावर्षी पावसाने दिलेली हुलकावणी आणि शेतकºयांनी वापरलेली महागडी बियाणे त्यामुळे शेतीचा खर्च देखील निघाला नाही. कांद्याला भाव नाही ऊसावर हुमणी रोगाचे आक्रमण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यात शेतमालाला योग्य तो भाव नाही. शासनाकडून दुष्काळ जाहिर झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणीदेखील केली. त्यामुळे शेतकºयांच्या व मजुर वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहे. परंतु शेतकºयांच्या हातात काय पदरी पडणार हा प्रश्न कायम आहे.
शासनाकडुन शेतकºयांच्या अपेक्षा
गिरणा व मन्याड परिसरात यावर्षी पाऊस न झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. शेतकºयाच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा वाढणार आहे. त्यामुळे शासनाने शेतसारा पूर्ण माफ करावा. तसेच कर्जमाफीपासून वंचित शेतकºयांना कर्ज माफ करीत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयोची कामे सुरु करावी अशी मागणी होत आहे.
२२ खेड्यांचा प्रश्न कायम
यंदा पावसाळा पूर्ण कोरडा गेला. त्यातच मन्याड धरण पुर्णता कोरडे ठाक आहे. त्यामुळे मन्याड परिसरातील आलवाडी तळोदे शिरसगांव ब्राम्हण शेवगे देशमुखवाडी, काकडणे, माळशेवगे, सायगांव, नांद्रेसहीत २२ खेड्यांचा प्रश्न संकटमय झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुराढोरांचा प्रश्न त्यात मजुर वर्गाला काम नसल्याने आगामीे दिवस संकटमय जाणार आहे.