यावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 09:49 PM2018-12-10T21:49:30+5:302018-12-10T21:50:42+5:30

गेल्या सात वर्षापासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याचे आदेश आमदार जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. संकुलाच्या तीन कोटी ६५ लाखांपैकी एक कोटी ४० लाखाची तरतूद शासनाने केली असून, पैकी ४० लाख क्रीडा विभागास मिळाले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे. उर्वरित प्रस्तावित दोन कोटी २५ लाखाची तरतूत करावी लागेल, असे पाटील यांनी सांगितले.

Work of Taluka Sports Complex, located at Yaval, commenced soon | यावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात

यावल येथे रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामास लवकरच सुरूवात

Next
ठळक मुद्देतहसील कार्यालयात झाली आढावा बैठकतीन कोटी ६५ लाखांपैकी एक कोटी ४० लाखांची शासनाकडून तरतूद

यावल, जि.जळगाव : गेल्या सात वर्षापासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याचे आदेश आमदार जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. संकुलाच्या तीन कोटी ६५ लाखांपैकी एक कोटी ४० लाखाची तरतूद शासनाने केली असून, पैकी ४० लाख क्रीडा विभागास मिळाले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली आहे. उर्वरित प्रस्तावित दोन कोटी २५ लाखाची तरतूत करावी लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार जावळे यांच्या अध्यतेखाली येथील तहसील कार्यालयात सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ही माहिती देण्यात आली. बैठकीस तहसीलदार कुंदन हिरे, सार्व. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधियंता रवींद्र चिरमाडे, मुख्याधिकारी रवींद लांडगे, भूमी अभिलेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले की, यावल ताुलका क्रीडा संकुलासाठी तीन कोटी ६५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे सांगून तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. त्यापैकी एक कोटी ४० लाखाची गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, त्यातील क्रीडा विभागास ४० लाख रुपये प्राप्त झाले असल्याचे सांगून उर्वरीत दोन कोटी २५ लाखाची तरतूद करणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्राप्त ४० लाखाचे निधीतून जागेस तत्काळ सरंक्षण भिंत उभारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र चिरमाडे यांना आमदार जावळे यांनी दिले आहेत. उर्वरित निधीसाठी तालुका बहुल आदिवासी असल्याने आदिवासी विकास मंत्रालयाकडून किंवा अर्थ मंत्रालयाकडून घेता येईल. याबाबत मंगळवारी मुंबईत संबधितांशी बोलणी करणार असल्याचे सांगितले.
बैठकीनंतर क्रीडा संकुलाच्या या जागेची पाहणी आमदार हरिभाऊ जावळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. शासनाने यासाठी चार हेक्टर ४० आर जागा मंजूर केलेली आहे. याप्रसंगी सर्व अधिकारी संगायोचे चेअरमन विलास चौधरी, न.पा.चे अभियंता शेख, नगरसेवक असलम शेख, उज्जेनसिंग पाटील उपस्थित होते.

Web Title: Work of Taluka Sports Complex, located at Yaval, commenced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.