9 महिन्यात पूर्ण होणार बोगद्यांचे काम

By admin | Published: January 11, 2017 12:28 AM2017-01-11T00:28:03+5:302017-01-11T00:28:03+5:30

20 जानेवारीपासून कामाला सुरुवात शक्य : ‘एसएमआयटी’कॉलेज रस्ता जोडला जाणार

Work of tunnels to be completed in 9 months | 9 महिन्यात पूर्ण होणार बोगद्यांचे काम

9 महिन्यात पूर्ण होणार बोगद्यांचे काम

Next

जळगाव : बजरंग बोगद्यानजीक उभारण्यात येणा:या दोन बोगद्यांचे प्रत्यक्ष काम  20 जानेवारीपासून सुरु होण्याची शक्यता असून नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत. या कामाचा नकाशा  अंतिम मंजुरीसाठी रेल्वेच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
या कामाचे कार्यादेश सोमवारीच सोलापूर येथील एस.एस.रुपचंदानी या ठेकेदारास दिले आहेत. या कामासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपये लागतील.
या कामाची पाहणी करण्यासंबंधी मंगळवारी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातील अधिका:यांनी संबंधित ठेकेदाराशी मंगळवारी संपर्क साधला. संबंधित ठेकेदार येत्या आठवडय़ात त्याची पाहणी करणार आहे.  ठेकेदाराकडून अनामत रक्कम घेतली आहे. तर महापालिकेने या कामासाठी रेल्वेला तीन कोटी 75 लाख रुपये दिले आहेत.

Web Title: Work of tunnels to be completed in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.