साकेगावजवळ महामार्गावरील नवोदय पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:56 PM2020-08-28T23:56:57+5:302020-08-28T23:59:40+5:30
नवोदय विद्यालयासमोर पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.
भुसावळ, जि.जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, नवोदय विद्यालयासमोर पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने साकेगाव फाट्यावरून वाहतूक सर्व्हीस मार्गाने वळविण्यात आली आहे.
पूर्वीपेक्षा महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून २७ रोजी दुपारी नवोदय विद्यालयात समोरून भुसावळ शहराकडे वळणाऱ्या रस्त्यासमोरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलावर १० गर्डर टाकण्यात येणार असून, गर्डर टाकण्यासाठी सुमारे तीन दिवस लागतील.
वाहतूक वळवली
साकेगाव फाट्यावरून नवोदय विद्यालय सुमारे दीड कि.मी. अंतर आहे. मात्र गर्डर टाकण्याचे कार्य सुरू असल्याने नवोदय विद्यालयासमोरील खुल्या पुलाखालून वळण घेऊन वाहतूक सुरू होती, मात्र साकेगाव वाय पॉर्इंट फाट्यावरून एकतर्फी वाहतूक सुरू राहावी याकरिता सर्व्हिस रोड खुला करण्यात आला आहे. जळगाव - भुसावळचा मार्ग साकेगाव वाय पॉईंटवर बंद करण्यात आला आहे.
लाईफ केअर मागील नवोदय विद्यासमोरील गार्डन पुलावर गर्डर टाकण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे महामार्गावरून शहरात येणारी वाहतूक येऊन यावल, रावेर, मध्य प्रदेशाकडे जाणाºया वाहनांना जय जवान पंपासमोरून फेरा मारून यावे लागत आहे.
दरम्यान, अत्याधुनिक मशिनरीद्वारे गर्डर टाकण्याचे कार्य सुरू झाले आहे. या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी तीन ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.