तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:27 PM2018-12-28T16:27:18+5:302018-12-28T16:28:49+5:30

महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

The work will start from the next week | तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून

तरसोद-फागणे टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे काम सुरु होणारप्रक्रियेची अधिकाऱ्यांनी गडकरींना दिली माहितीठेकेदार ६० टक्के निधी उभारू न शकल्याने काम ठप्प

जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या चौपदरीकरणाची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाणून घेतली. यात या कामाची ई-निविदा प्रसिद्ध केली असल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाºयांनी गडकरी यांना दिली.
महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हालचालींना वेग आला व हे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्ह्यातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे अनेक महिन्यांपासून आहे. सुरुवातीला काही वर्ष तर निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने वाया गेले. तर नंतर एल. अ‍ॅण्ड टी. सारख्या कंपनीने मक्ता घेऊन नंतर काम सोडून दिले. अखेर जिल्ह्यातील कामाचे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या. तरीदेखील मक्तेदार त्याच्या हिश्शाचा ६० टक्के उभारू न शकल्याने गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. मात्र आता तरी हे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जळगावातील रस्त्यांची घेतली माहिती
बुधवारी दिल्ली येथे नितीन गडकरी यांनी राज्यातील रखडलेल्या रस्त्यांची माहिती जाणून घेतली. त्यात जळगाव शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंतच्या ८ किमी चौपदरीकरणाचीही विचारणा केली. त्यात नहीच्या अधिकाºयांनी या कामाची सुमारे ७० कोटींची ई-निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती गडकरी यांना दिली. दरम्यान, ३० जानेवारी २०१९पर्यंत या कामासाठी निविदा भरण्याची मुदत आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर आठवडाभरात किती निविदा दाखल झाल्या याबाबत मात्र आकडेवारी मिळू शकली नाही.

Web Title: The work will start from the next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.