जळगावात महिला रुग्णालयाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:06 PM2018-10-25T13:06:37+5:302018-10-25T13:06:59+5:30

फेब्रुवारी २०२०पर्यंत पूर्ण होणार रुग्णालय

The work of women hospital at Jalgaon | जळगावात महिला रुग्णालयाच्या कामाला वेग

जळगावात महिला रुग्णालयाच्या कामाला वेग

Next
ठळक मुद्देउर्वरित दोन इमारतीच्या पाया खोदण्याची तयारीएकूण पाच इमारती

विजयकुमार सैतवाल
जळगाव : मोहाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या महिलांच्या १०० खाटांच्या रुग्णालयाच्या कामाने गती घेतली असून इमारतीवर छत टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. विविध कक्ष, कार्यालय अशा एकूण तीन इमारती एक सोबत उभ्या राहत असून इतर दोन इमारतीसाठी पाया खोदण्याची तयारी केली जात आहे. फेब्रुवारी २०२०पर्यंत ही इमारत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याने जागा व खाटा कमी पडू लागल्याने गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळाली. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने हे काम मार्गी लागत नसल्याचे चित्र होते. अखेर शासनाने जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यापूर्वीच १०० खाटांच्या या महिला रूग्णालयाला मंजुरी दिली. त्यासाठी मोहाडी शिवारातील जागाही निश्चित करण्यात येऊन २०१७मध्ये या कामाच्या निविदा निघाल्या व मक्तेदाराला या कामाचे कार्यादेशही देण्यात आले.
एकूण पाच इमारती
रुग्णालयाच्या कामासंदर्भात मोहाडी रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी ए विंग ते ई विंग अशा एकूण पाच वेगवेगळ््या इमारती राहणार आहे. यात बी विंग, सी विंग, ई विंग अशा तीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. यातील बी विंग इमारतीच्या दुसºया मजल्याचे काम सुरू आहे. या इमारतीमध्ये महिला कक्ष राहणार आहे. शस्त्रक्रियागृह, एक्स-रे खोली, कार्यालय असणाºया ई विंग इमारतीचे छत टाकले गेले असून दुसºया मजल्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. सी बिंग मध्ये जनरल वार्ड राहणार असून त्याचे काम लिंटेलपर्यंत आले आहे.
दोन इमारतीच्या पाया खोदण्याची तयारी
ए विंग व डी विंग इमारतीचे काम अद्याप सुरू झाले नसून त्याच्या पाया खोदण्याची तयारी करण्यात येत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आडळून आले. या कामासाठी खुणा करण्याचे काम सुरू असून आठवडाभरात पाया खोदकामास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
फेब्रुवारी २०१८मध्ये या रूग्णालयाच्या कामास
मक्तेदाराला या कामाचे कार्यादेश दिल्यानंतर फेब्रुवारी २०१८मध्ये या रूग्णालयाच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला. आॅगस्ट महिन्यात या रूग्णालयाच्या इमारतीचे काही काम लिंटेल लेव्हलपर्यंत तर काही काम प्लिंथ लेव्हलपर्यंत झाले होते. त्यानंतर दोन महिन्यात हे काम छतापर्यंत आले.
निवासस्थानांच्या कामास अद्याप वेळ
जळगावात वैद्यकीय संकुलास मंजुरी मिळण्यासह महिला रूग्णालयाच्या कामालाही गती मिळाली असल्याने महिला रुग्णांची सोय होणार आहे. मेडीकल हब हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. तर हे महिला रूग्णालय आरोग्य विभागाच्या म्हणजेच जिल्हा रूग्णालयाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. रूग्णालयाचे एकूण अंदाजपत्रक सुमारे ५० कोटींचे आहे. पहिल्या टप्प्यात रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून दुसºया टप्प्यात कर्मचारी निवासस्थानांचे काम केले जाणार आहे.
फेब्रुवारी २०२०पर्यंत होणार पूर्ण
१०० खाटांच्या रूग्णालयासाठी मोहाडी शिवारातील ५ एकर जागा घेण्यात आली असून त्यातील ८ हजार ८८३ चौरस मीटर जागेवर महिला रूग्णालयाची ही इमारत उभारण्यात येत आहे. तळमजला अधिक दोन अशी तीन मजली इमारत राहणार आहे. हे काम २८ कोटींचे असून फेब्रुवारी २०२०पर्यंत पूर्ण करण्याची मुदत मक्तेदाराला देण्यात आली आहे.

महिला रुग्णालयाचे काम वेगाने सुरू असून फेब्रुवारी २०२०पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: The work of women hospital at Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.