सजावट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:47 PM2019-09-02T12:47:16+5:302019-09-02T12:48:00+5:30
जळगाव : लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन होत ंआहे. आठवडाभरापासून सुरु असलेले आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी रविवारी दिवसभर मंडळाच्या ...
जळगाव : लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन होत ंआहे. आठवडाभरापासून सुरु असलेले आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी रविवारी दिवसभर मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. श्री गणरायाची स्थापना झाल्यानंतर शहरातील बहुतांश मंडळांतर्फे दोन ते तीन दिवसात साकारण्यात आलेले देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत.
यदांही सार्वजनिक गणेश मंडळातर्फे धार्मिक व प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. आठवडाभरापासून देखाव्याचे काम करण्यात येत आहे. हे देखावे साकारण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बंगालमधून व मध्यप्रदेशातून कारागीर मागविले आहेत.
या कारागिरांकडून मनासारखे देखावे साकारुन घेण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी गणेशाची स्थापना होत असल्याने, रविवारी विशेषत : नवीपेठेतील मोठ्या गणेश मंडळांचे आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी सकाळपासूनच काम सुरु असलेले दिसून आले.
मंडप उभारणे, स्टेज तयार करणे, विद्युत रोषणाई लावणे यासह सोमवारच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना दिसून आले. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण गणेशोत्सवासाठी जोमाने तयारी करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले.